पोस्ट्स

मार्च १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतात रंगणार ६४ घरांचे ऑलम्पियाड

इमेज
               रशिया आणि युक्रेन या मधील युद्धाचे परिणाम आता जाणवायला सुरवात झाली आहे आक्रमक असणाऱ्या रशियाला अद्दल घडण्यासाठी रशियावर विविध आर्थिक बंधने तर लादली जात आहेत .  याच बंधनाच्या मालिकेत  विविध खेळाच्या संघटना देखील रशियाला आपल्या खेळाच्या संघटनेतून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवत आहे . . खेळाच्या संघटनेतून बाहेर पडत असल्याने आगामी काळात रशियात होणाऱ्या खेळांचे आयोजन कुठे करायचे ? या बाबत  विविध पर्याय सध्या खेळाच्या संघटनांकडून  अजमावून बघितले जात आहेत .या स्पर्धा आयोजनाच्या चक्रात बुद्धिबळ ऑलम्पियाड देखील सापडले होते . मात्र या चक्रातून बुद्धिबळाची सहीसलामत सुटका झाली आहे . ४४ वे बुद्धिबळ ऑलम्पियाड आपल्या भारतात महाबलीपूरम येथे होणार आहे याच्या तारखा हा मजकूर लिहण्यापर्यंत जाहीर झालेल्या नाहीत तुम्ही हा मजकूर वाचेपर्यंत कदाचित त्या जाहीर झालेल्या असतील मात्र बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अर्थत फिडेच्या संकेतस्थळावर दिलेल्या बातमीनुसार त्या या वर्षीच्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडा या दरम्यान बुद्धिबळाचे ऑलम्पियाड होईल जे मुळातील २२ जुलै त