पोस्ट्स

फेब्रुवारी २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन धगधगत्या अग्निकुंडाला !

इमेज
स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या भारतमातेचे असे एक सुपुञ होते कि ज्यांना स्वत:हून लोक स्वातंञ्यवीर म्हणत मला तरी जगात स्वातंञ्यवीर सावरकरांखरीच असा एकही व्यक्ती माहीती नाही की ज्याला लोक Liberty warrior or Independent warrior /Freedom warrior अश्या नावाने ओळखले जाते  हिंदू धर्मात पहिल्या पूजेचा  मान मिळालेल्या गणपती चे नाव घेऊन आलेल्या नाशिकजवळच्या भगुरचा या वीराची महती इथेच संपत नाही सावरकरांनी काय केले याच्या ऐवजी काय केले नाही असे विचारणे जास्त संयुक्तीक ठरेल त्यांनी भाषेबाबत कार्य केले त्यांनी सयमसुचकता म्हणजे काय ? ती कशी वापरतात याचा वस्तुपाठच घालून दिला सिध्दहस्त लेखक म्हणजे काय याचा वस्तू पाठच जणु सावरकरांनी घालून दिला त्याचे लेखन मुलत: वाचले कि कळते एखाद्या भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय पलेदार शब्द लांबलचक वाक्य अश्या साजशृंगीत भाषेत लेखन करावेत ते सावरकरांनीच सध्या त्यांचे जे लेखन प्रसिध्द केले जाते ते बहुसंख्य वेळेस पुनर्लेखन  केलेले साहित्य असते त्यांचे मुळ साहित्य जो वाचेल त्याची मराठी अम्रुताहूनी मधुर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे त्यांचे कमला हे मराठीतील माझ्य

बदलती शेजारची गणिते (भाग 1)

इमेज
आपल्या भारतात करोनाविषयक बातम्यांनी, आणि महाराष्ट्रात पुजा  चव्हाण च्या मृत्यूविषयी माध्यमे बातम्यांचा रतिब घालत असताना, आपल्या भारताच्या शेजारील देशांमध्ये अनेक घडामोडी घडत आहे. ज्यामध्ये श्रीलंका, नेपाळ, आणि म्यानमार मधील घडामोडींचा उल्लेख अपरीहार्य आहे.  माझे आजचे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी . पहिल्यांंदा श्रीलंका या देशाविषयी बघूया  तर मित्रांनो आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंका या देशात दोन समांतर घडामोडीनी मोठी उलथापथ होत आहे. या दोन्ही घडामोडींशी भारताचा जवळचा सबंध आहे.त्यामुळे त्या आपणाला माहिती असणे आवश्यक आहे. पहिले जूना संदर्भ असलेली घटना बघूया तर, सन 2018 मध्ये ख्रिस्ती धर्मिय बांधवांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या इस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत चर्चमध्ये स्फोट झाले होते,ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेविषयी चौकशी करणाऱ्या आयोगाने नुकताच अहवाल सादर केला आहे. ज्यात त्यावेळचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसेना  यांना या हल्ल्यासाठी दोषी धरुन त्यांना शिक्षा करावी ,असी सुचना करण्यात आली आहे. भारताकडून संभाव्य हल्ल्याची माहिती देवूनही आवश्यक ती कार्यवाही न केल्याने