पोस्ट्स

जुलै २६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टोल नाका जीव वाचण्याचे साधन

इमेज
नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल मधून लवकर सुटका  नसल्याचे एका ठिकाणी सांगितले आणि विविध चर्चेला उधाण आले . आपण आपले वाहन रस्त्यावर आणताना विविध कर भरतोच .  मग हा टोलचा भुर्दंड कशासाठी ?   आदी प्रतिक्रिमा  यावर विविध माध्यमातून उमटू लागल्या . मात्र सध्याच्या वाढलेल्या अपघाताच्या पाश्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी  आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , या टोल  नाक्याच्या सुयोग्य वापर केल्यास स्पीड गन सारख्या खर्चिक  उपाय ना योजता अपघाताला बऱ्याच मोठ्या प्रमाणांत आळा घालता येऊ शकतो .              आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसऱ्या  टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणाऱ्या  वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्याऱ्या  वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक आपसूकच हळू चालवतील.  कारण प्रत्येकाला आपला प

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा .

इमेज
तिर्थस्वरुप  डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार  डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20  आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 6 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना  पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला  शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा . .हिंदुत्वाचा कैवार असलेले लोक आता सत्तेत आहेत . माञ प्रखर हिदुत्ववादी असणार्या स्वातंञ्यवीर सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा  त्यांना विसर पडलेला दिसतोय . ज्या कायद्यासाठी तुम्ही प्राणापर्ण केले तो कायदा सत्तेत आल्यावर रद्द करू म्हणणारे सध्या सत्तेत आहेत .माञ ते ही गोष्ट विसरलेत बहुदा . आणि  जे योग्यच आहे ना ?काही दिवसापूर्वी  कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्यारापर्यत सरकार पोहचलेय असी बातमी वाचली .  तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. सांगायचा मुद्दा असा की जरी तुमचा हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना