पोस्ट्स

जानेवारी १७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रत्तेर एस टी एक समस्या

इमेज
नुकतीच  मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला रात्री भेट दिली . तेथील दृश्य बघून  मी थबकलोच,  आपण महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये असल्यासारखा भास व्हावा असे ते दृश्य होते .  महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील शहर असूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटकच्या बसेसची संख्या जास्त होती . मागे मी हा प्रकार कोल्हापूर बसस्थानकावर बघितला होता .मात्र  कोल्हापूर कर्नाटक  सीमेपासून निव्वळ २५ किमी असल्याने मी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता . त्यानंतर याविषयीची अधिक माहिती मिळावी म्हणून कर्नाटक राज्य परिवहनाच्या  संकेतस्थळावर भेट दिली असता तेथील माहिती झोप उडवणारी होती. कर्नाटक सरकार राज्याबाहेर दुसऱ्या राज्यातील ४० मार्गावर सेवा पुरवते या ४० पैकी २९ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत .  मागे मी एकदा कराडला गेलो असता मी बेळगाव ते नीरा या मार्गावरील कर्नाटक परिवहन महामंडळाची बस ब घितली होती . मित्रानो नीरा हे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत असणारे गाव आहे . म्हणजेच तुम्ही समजू शकता कर्नाटक किती आतापर्यंत पोहोचले आहे . नाशिकहून बेळगावला कर्नाटक परिवहन महामंडळाच्या २ बसेस आहेत . म