गच्छंती डोनाल्ड ट्रम्प यांची
सध्या फक्त आपल्या भारतातातच नव्हे तर , समस्त जगभरात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत . ऑस्ट्रोलियाच्या पूर्व भागात लागलेला वणवा असो , अथवा ब्राझीलच्या -लुला या माजी राष्ट्राध्यक्षाची कारागृहातून झालेली सुटका असो . अथवा २५ सप्टेंबरपासून सुरु झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाचे नाट्य ही त्यापैकी काही प्रातिनिधिक उदाहरणे . माझ्या मते यातील या सर्व घडामोडीतील सर्वात महत्तवाची घडामोड म्हणजे . डोनाल्ड ट्रूम्प यांच्यावर चालवण्यात येणार महाभियोग . जगातील सर्वात प्रबळ अश्या राष्ट्राचा प्रमुखांवर ते प्रमुखपद काढण्यासाठी चालवण्यात येणार खटला म्हणजे हा महाभियोग होय . ...