पोस्ट्स

नोव्हेंबर २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या सॉफ्ट पॉवरची गगनभरारी

इमेज
एखाद्या देशाच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे नाही तर सांस्कृतिक प्रभाव आणि अन्य मानवतावादी मदतीमुळे दुसऱ्या देशाचा प्रभाव जर एखाद्या देशावर असेल तर त्यास ज्या देशाचा प्रभाव आहे त्या देशाची ती सॉफ्ट पॉवर आहे असे संबोधतले जाते . जागतिक राजकारणात या सॉफ्ट पॉवरला अन्यन्य साधारण महत्व आहे ज्या गोष्टी लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे  शक्य होत नाही अश्या अनेक गोष्टी सॉफ्ट पॉवरमुळे विनासयास  साध्य होतात.  वसाहतवादाचे शिकार झालेल्या भारतासारख्या देशात दुसऱ्या वसाहतवादी देशात असणारे मूळ देशाचे नागरिक हि सुद्धा सॉफ्ट पॉवर असते जगभरातील सर्वच देश या सॉफ्ट पॉवरचा कमी अधिक वापर करतात . ज्यास भारत देखील अपवाद नाही आग्नेय आशियातील विविध देशांशी तसेच सार्क या संघटनेतील विविध देशांबरोबर  भारत याचा मोठ्या खुबीने वापर करतो  भारताच्या याच मालिकेतील नवा अध्याय २६ नोव्हेंबर रोजी लिहला गेला   आंध्रप्रदेश राज्यातील  सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण तळावरून  २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास एकूण ९ उपग्रह पी एस एल व्ही या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण प्रणालीचा व