पोस्ट्स

जून ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन ( भाग8)

इमेज
          चीन आपल्या आपल्या भारताच्या 27 राज्यांपैकी 4 आणि 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एका केंद्रशासित प्रदेशाबरोबर बॉर्डर शेअर करणाऱ्या चीनबाबत नुकत्याच 4 घडामोडी घडल्या . चीनची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात घटल्याने चीनने त्याचा लोकसंख्या धोरणात अमुलाग्र ठरेल असा  बदल करणे, तसेच सुर्याबरोबर  बरोबरी करू शकेल असे तापमान 121 सेकंड तापमान तयार करणे , तसेच नव्या प्रकारच्या इंफुलंझा चा रुग्ण सापडणे या बरोबरच अरुणाचल प्रदेशाजवळच्या सीमावर्ती प्रदेशात महामार्ग बांधणे यांचा समावेश करावाच लागेल . आपल्या मित्राबरोबर आपला शत्रू काय करत आहे? याची माहिती असणे अत्यावश्यक आहे, असे परराष्ट्र संबधात प्रसिद्ध तत्व आहे. त्यानुसार चीनविषयक या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे.  तर बघूया या घडामोडी.              तर चीनने 1979 या वर्षी  एक मुल धोरण अमंलात आणण्यास सुरवात केली.ज्यामुळे  चीनची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. परीणामी चीनची कार्यप्रवण लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली. तर वयोवृद्ध लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी चीनने त्याचा लोकसंख्या धोरणात प्रचंड