पोस्ट्स

जुलै १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवस आहे खास बुद्धिबळाचा

इमेज
   आपल्याकडे विविध  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टींचे दिन साजरे केले जातात. काही वेळेस एखाद्या व्याधी विषयक दिन साजरे केले जातात.काही दिवस एखाद्या विशिष्ट क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जातात. जसे 15सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय इंजिनिरींग दिन किंवा 23 मे रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय स्किझोफेनिया दिन. मात्र जर कोणी आपणास सांगितले एखाद्या खेळाला समर्पित असणारा एखादा हादिन आहे तर.! तूम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे. तर मित्रांनो, असा एक खेळ आहे. ज्याचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो, तो म्हणजे 20जूलै रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन. सन 1966 पासून बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय संघटना जी फिडे या संक्षीप्त नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेमार्फत अर्थात फेडरेशन इंटरनँशल डिइचेस या संघटनेतर्फे हा दिन साजरा करण्यात येतो.               नुकत्याच फुटबाँलविषयक जागतिक स्तरावरच्या दोन स्पर्धा झाल्या. त्याआधी टेनिस मधील.महत्तवाच्या चार स्पर्धांपैकी एक असणारी विबल्डन ही स्पर्धा झाली . या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची भुमिका अत्यंत मर्यादित असते. ख