पोस्ट्स

नोव्हेंबर १७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत भूतान मैत्री नव्या वळणावर

इमेज
              मित्रानो,आपला  भारत शेजारील देशांशी  नव्याने मैत्रीपूर्ण सबंध प्रस्थपित करत आहे , हे आपण जाणताच . बांगलादेश मालदीव म्यानमार या देशांशी आपल्या भारताशी चीनचा प्रभाव असताना नव्याने निर्माण होणारे मैत्रीपूर्ण सबंध आपण या आधीच बघितले आहेत ते  ज्यांनी वाचले नसतील त्यांच्यासाठी या लेखाच्या शेवटी त्यांचा लिंक दिलेल्या आहेत . त्या ठिकाणी जाऊन आपण ते वाचू शकतात या लेखात मी बोलणार आहे ते भूतान या देशाविषयी                   भूतान हा  भारत आणि चीन या दोन महासत्ताच्या मधोमध असणारे हिमालयाच्या कुशीतील एक बफर  देश आहे . भारताच्या शेजारील देशांमध्ये घटनादत्त राजेशाही असणारा हा एकमेव देश आहे . .प्रजेची मागणी नसताना शांततेने आपले अधिकार कमी करता जनतेला लोकशाही मार्गावर नेणारा राजा म्हणून भूतानच्या राजाची ओळख आहे . एकीकडे सर्व जग जीडीपी च्या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजत असताना देशातील लोक किती आनंदी आहे , या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजण्याची शिकवण जगाला देणारा देश म्हणजे भूतान . भारताच्या पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश या चार राज्याशी मिआहेत . ळून एकत्रित  600 किलोमीटरची सीमा