पोस्ट्स

मे १३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हेल्मेट सक्ती च्या नावाने चांगभलं

इमेज
                     सध्या नाशिक शहरामध्ये सर्वत्र हेल्मेट सक्तीची चर्चा जोरदारपणे चालू आहे . हेल्मेट सक्तीचे पुरस्कर्ते हेल्मेटअभावी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या सांगून हेल्मेट किती उपयोगी असे सांगत आहे . मात्र या सक्तीच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्ती एका मुद्द्यावर  जाणूनबुजून सांगत नाहीये .                                ते म्हणजे हेल्मेट नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी  किती जणांना त्यांचा अपघात  झाल्यावर सुरवातीच्या २० मिनिटात ज्याला वैद्यकीय भाषेत कृशल अवर म्हणतात , त्या कालावधीत वैद्यकीय उपचार मिळाले होते.        कोणत्याही  अपघातात व्यक्तीला सुरवातीच्या कालावधीत मिळणाऱ्या उपचारांना अनन्यसाधारण महत्व आहे. जर ते योग्य प्रमाणात मिळाले तर कोणतीही व्यक्ती सहजतेने वाचू शकते , जरी त्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसले तरी . आणि या वीस मिनिटात योग्य ते उपचार न मिळाल्यास हेल्मेट घातलेली  व्यक्ती सुद्धा मृत होऊ शकते . या महत्तवाच्या  मुद्यावर कोणीही हेल्मेट सक्ती च्या बाजूने लढणारा बोलत नाहीये . निदान माझ्यातरी पाहण्यात अशी व्यक्ती आलेली नाही . मनुष्याला मेंदूला लागलेल्य