पोस्ट्स

जानेवारी २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नांदी 46 व्या अमेरीकी अध्यक्षाची

इमेज
      विविध घटनात्मक, आणि अवैध उपाय अमंलात आणून सुद्धा आपली डाळ शिजत नाही, हे लक्षात आल्याने, अखेर विविध परपरांना तिलांजली देत, 20 जानेवारी 2021 रोजी अमेरीकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सुत्रे जाँन आर. बायडन यांच्याकडे सुपुर्त केली, आणि एका वादगस्त पर्वाची अखेर झाली.         डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादगस्त पर्वाची सुरवात त्यांचा निवडीपासूनच झाली. लोकांचा जनाधार(पाँप्युलर वोट) विरोधी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना असून देखील इलेक्ट्रोर जास्त संख्येने निवडून आल्याने राष्ट्रपतीपदाची माळ गळ्यात पडलेल्या (याच मुद्यावरुन जाँन बायडन राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत.)  डोनाल्ड ट्रम्प यांनी सुत्रे हाती घेताच  डेमोक्रेटीक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, सेक्रेटरी आँफ स्टेट (आपल्या परराष्ट्र मंत्र्याचा समकक्ष )पदावर कार्यरत असताना सरकारी कामासाठी खासगी इमेल वापरले.ज्यामुळे देशाची सुरक्षीतता धोक्यात आली. त्यामुळे त्यांना तूरुंगात टाकण्याची भाषा केली.  डोनाल्ड ट्रम्प यांचा सगळाच कार्यकाळ वादगस्त ठरला. त्यांना निवडून आणण्यामागे रशियाचा हात आहे, असाही आरोप त