पोस्ट्स

डिसेंबर १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामानाचे संकट अजूनच धोकादायक

इमेज
          हवामानाचे संकट अजूनच धोकादायक बनत चालल्याचे दिसून येत आहे नुकत्याच या बाबत दोन  अभ्यास जागतिक स्वरावर प्रसिद्ध करण्यात आले .एक अभ्यास तापमानवाढीविषयी होता तर दुसरा हवामान बदलामुळे दक्षिण अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या अल्बर्ट रोस या पक्ष्याच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत आहे .           प्रथमतः तापमानवाढीविषयी बघूया तर मित्रानो वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशन या संस्थेमार्फत १५ डिसेंबर  रोजी एक धक्कादायक माहिती प्रसिद्ध करण्यात आली . वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशन ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत हवामन तसेच  वातावरण बदल या विषयी अभ्यास करणारी विविध प्रकारची नोंद ठेवणारी संघटना आहे जिचे मुख्यालय स्विझर्लंड येथील जिनिव्हा येथे आहे या संस्थेमार्फत अन्य वेळी जगातील थंड तापमानाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सायबेरिया या प्रदेशात तापमान वाढीची आता पर्यंतची सर्वात मोठी नोंद घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले ज्या ठिकाणी अन्य वेळी उन्हाळ्यात दहा अंश ते जास्तीत जास्त १५ अंश तापमान  सॅलिसिसपेक्षा  तापमान आढळते त्या सायबेरिया प्रदेशातील वारखोनास या शहरात  २० जून २०२० रोजी त