पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब बुद्धिबळाचा (भाग 14)

इमेज
             भारतीय पुरुष क्रिकेटपटूंनी भारतीयांची कितीही निराशा केलेली असली तरी भारतीय बुद्धिबळपटू मात्र सातत्याने भारतीयांची मान उंचावत ठेवण्याची कामगिरी करत आहे .   नागपूरच्या रहिवाशी असणाऱ्या दिव्या देशमुख यांनी १३ ऑक्टोबर रोजी  भारताची २१ वी वूमन  ग्रँडमास्टर होण्याची कामगिरी केल्यावर  महिना होत नाही तोच भारताला दोन ग्रँडमास्टर मिळाले आणि भारताची ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली . ७ नोव्हेंबरला सायंकाळी भारताला संकल्प गुप्ता हा ७१ वा ग्रँडमास्टर मिळाल्याची बातमी ताजी असतानांच किंबहुना एका दिवसाच्या अंतराने ९ नोव्हेंबर रोजी  भारताला मित्रभा गुहा हा ७२वा ग्रँडमास्टर मिळाल्याची बातमी  आली, आणि भारतीयांच्या आनंदाला स्वर्ग दोन बोटे शिल्लक राहिला .        ७ नोव्हेंबर रोजी  रहिवाशी असणाऱ्या संकल्प गुप्ता या बुद्धिबळपटूने सर्बिया या देशातील अरंडजेलोवाक  ( Arandjelovac) या शहरात सुरु असणाऱ्या  GM Ask 3 round-robin event या स्पर्धेत साडेसहा गुणांसह दुसरा संकल्प गुप्ता  क्रमांक पटवत ग्रँडमास्टर पद मिळवण्यासाठीचा आवश्यक असा  तिसरा आणि अंतिम निकष पूर्ण केला आणि ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली . १

असी आहे आपली एसटी !

इमेज
     सध्या महाराष्ट्रात ज्या घडामोडींची चर्चा सुरु आहे, अस्या गोष्टींची यादी केल्यास,  आपणास एसटीचा क्रमांक अत्यंत वरचा ठेवावा लागेल. आपली एसटी ही जगातील एक अदभूत संस्था आहे. या एसटीकडून विविध प्रकारच्या 10प्रकारच्या बसेस चालवण्यात येतात. त्यातील एका प्रकारचे 5 उपप्रकार आहेत.एसटीची अदभुदता येथेच संपत नाही,इतर राज्यातील एसटी देत नाही, अस्या अनेक सवलती आपल्या एसटीकडून देण्यात येतात..एक जागरूक नागरीक म्हणून आपणास त्यास माहिती असणे आवश्यक आहे, चला तर मग जाणून घेवूया या सवलती. एसटीकडून देण्यात येणाऱ्या काही सवलती विशिष्ट समाजघटकाला देण्यात येतात तर काही सवलती सर्वांना देण्यात येतात. सर्वप्रथम सर्वांना देण्यात येणाऱ्या सवलती बघूया.      तर वयाची 65 वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तींना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो. यासाठी आतापर्यत वयाचा दाखला पुरेसा होता. ज्या साठी मतदार ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो असलेले ओळखपत्र, पँन कार्ड, शालेय ओळखपत्र  असा सरकारमान्य कोणताही एक पुरावा आवश्यक होता. आता एसटीकडून ज्येष्ठ नागरिकांना विशेष कार्ड पुरवले जात आहे. ते दाखवून आता ही सवलत मिळेल.मी गुजरात