पोस्ट्स

ऑक्टोबर १४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयात सापडलेला देश पाकिस्तान

इमेज
               आपला शॅजारील देश पाकिस्तान मधून ज्या बातम्या सध्या ऐकायला वाचायला मिळत आहेत ते बघता ,"  राजकीय आणि आर्थिक समस्येच्या चक्रव्हयूयात सापडलेला देश पाकिस्तान " असे पाकिस्तानचे वर्णन केल्यास ते वावगे ठरू नये . अशी तेथील स्थिती आहे        विजेच्या वाढत्या दरामुळे देशातील शेतकऱ्यांबरोबर देशातील निर्यातीत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जवळपास ७० त योगदान असेलेल्या वस्त्रोद्योगाने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर   काहीच दिवस होत नाही तोच   देशाच्या दक्षिण भागात काही तांत्रिक कारणास्तव २४ तासाहून काहीसा अधिक काळ वीजपुरवठा पूर्णतः खंडित होते ज्या मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहराचा देखील समावेश आहे . देशातील परकीय चालनसाठा अत्यंत न्यूनतम पातळीवर पोहोचला आहे मित्र देशांनी दिलेल्या मदतीचा टेकू काढताच देश दिवाळखोर जाहीर करण्याच्या स्थितीत पोहोचला आहे पाकिस्तानात गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या विजेच्या पेचप्रसंगाचा आधी सुद्धा विजेची प्रचंड अनुपलब्धता आहे