पोस्ट्स

एसटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

इमेज
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इमेज
 मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री  महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेसी  साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही‌.झोपा...

इथेही 56

इमेज
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार  कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.        एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये‌.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय‌....

एसटी महामंडळाची उलट गंगा!

इमेज
    सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे  प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे  महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या  बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो  आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून  प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे‌.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता  हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीच...

15 नाही 66 टक्के दरवाढ

इमेज
आपल्या महाराष्ट्र एसटीने आपल्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्याची वाढ केल्याची माहिती तुम्हाला असेलच. ही दरवाढ जाहीर करताना, आपल्या महामंडळाने फक्त सर्वसाधारण तिकिटाचीच दरवाढ जाहीर केली होती, आणि एसटी महामंडळाकडून जे पास देण्यात येतात त्यांची दरवाढ नंतर जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. दरवाढ जाहीर केल्यानंतर 4 दिवसांनी अर्थात 29 जानेवारी रोजी महामंडळाने एक परिपत्रक जाहीर प्रसिद्ध करून पासची दरवाढ जाहीर केली..पासची दरवाढ  बघताना, 'आवडेल तिथे प्रवास' या पासामध्ये तब्बल 66% ची दरवाढ करण्यात आलेली आहे असे दिसून आले. जे पूर्णतः अयोग्य आहे.पुर्वी प्रौढांसाठी 4दिवसांसाठीचा शिवशाहीचा पास 1520रुपयांमध्ये होता जो आता 2533 रुपये तसेच साध्या बसचा 4दिवसांच्या प्रौढाच्या पाससाठी 1170 च्या ऐवजी 1814 रूपये मोजावे लागतील 7दिवसाच्या प्रौढ साध्या बसचा प्रवास 2040च्या 3171 रुपयांना मिळेल तर 7 दिवसाचा शिवशाही पास 3030ऐवजी 4429रूपयांना मिळेल        एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या या पासचा फायदा घेत, अनेक हौसी प्रवाशी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात फिरत असे.या प्रवाश्यांमुळे...

महाराष्ट्राच्या एसटीने गमावलेली संधी

इमेज
नुकतीच आपल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्यात आली सन 2021 पासून तिकीट दरात वाढ न केल्याचे कारण या निमित्तने देण्यात आले. एसटी महामंडळाचे उत्पन्नाचा मुख्य साधन असणाऱ्या तिकीटांचे दर आणि वाढलेले अन्य खर्च बघता  या समतोल साधण्यासाठी तिकिटाचे दर वाढवणे आवश्यकच होते असेही याबाबत सांगण्यात आले. मात्र या वाढलेल्या तिकीट दरांमुळे महाराष्ट्र एसटीने एक मोठी संधी मात्र गमावलेली आहे हे नाकारता येत नाही ती संधी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार करण्याची, आणि या  विस्तारातून आपला नफा अधिकाधिक वाढवण्याची .आपल्या शेजारील कर्नाटक राज्य हे त्यांच्या प्रादेशिक सीमांचा बाहेर मोठ्या प्रमाणात सेवा देत आपला नफा कमवते मात्र मात्र आपल्या महाराष्ट्र एस टी मध्ये 15 टक्के दरवाढ झाल्याने आपली ती संधी हूकलेली आहे हे सत्य स्वीकारायलाच हवे..     आपल्या भारतातील सर्व एस टी महामंडळाची एक शिखर संस्था आहे ऑल ऑल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन नावाची या ट्रान्सपोर्ट युनियनच्या नियमानुसार आंतरराज्य एसटी बस वाहतुकीचे नियमन होते या नियमानुसार एखाद्या राज्याला...

एसटीचे हे बदल आपणास माहिती आहे ना?

इमेज
गेले काही दिवस आपण सर्वजण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलो असताना, आपल्या एसटीमध्ये दोन घडामोडी घडल्या आणि एक अफवा पसरली. महामंडळाकडून 'शिवशाही' हा प्रकार बंद करण्यात आल्याचा अफवेबाबत महामंडळाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्याने, मी त्याविषयी बोलणार नाही .महामंडळाने आपल्या  बसेसच्या ताफ्यात केलेला बदलाविषयी फारसे न बोलले गेल्याने, त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन                  तर मित्रांनो, आताआतापर्यत महामंडळ,  अशोक लेलँड, टाटा किंवा आयशर या कंपनीकडुन फक्त चेसीस विकत घेत असे.त्यानंतर स्वत:च्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये त्यावर बस बांधणी करत असे.(एसटीच्या रत्नागिरी, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे स्व मालकीच्या कार्यशाळा आहेत) त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाचा अपव्यय होत असे.खासगी बसवाहतूकदार याच कंपन्यांकडून थेट तयार बस विकत घेत असताना, एसटी या प्रकारचे धोरण अमंलात आणत असल्यामुळे तीचे मोठे नुकसान देखील होत असे.हे नुकसान लक्षात आल्यामुळे, महामंडळाच्या व्यवस्थपकांनी काही महिन्यापुर्वी अशोक लेलँड कडुन २४...

देशातील बदलते सार्वजनिक परिवहन विश्व आणि आपली एसटी

इमेज
        सध्या देशातील परिवहन व्यवस्था वेगाने कात टाकत आहे.तामिळनाडु कर्नाटक सारखी मोठी आणि प्रगत राज्येच नव्हे तर हिमाचल प्रदेश सारख्या काहीस्या छोट्याशा राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा देखील अधिक आरामदायी प्रवाश्यांना हिताचा विचार करणारी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे इंटरनेटवर या संदर्भात माहिती घेतल्यास सहजतेने दिसून येते.      कर्नाटक तेलंगणा सारखी राज्ये अंबारी ऐरावत या ब्रँडनेमखाली अत्यंत आरामदायी सेवा ते देखील विविध मार्गांवर देत आहेत.गुजरात राज्याने देखील गेल्या काही महिन्यांत आपल्या सेवेचा दर्जा खुपचं उंचावला आहे. गुजरात राज्याने सर्वसाधारण प्रवाश्यांचा विचार करत आपल्या सर्वसाधारण प्रवाशी गाड्यांमध्ये पुर्वीपेक्षा अधिक आरामदायी आसने पुरवली आहेत बसमधील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी पुर्वीची ३बाय २ची आसनव्यवस्था मोडीत काढत २बाय २ची आसन व्यवस्था सुरु केली आहे. आपल्या एकुण बसेसपैकी जवळपास 50 टक्के बसेस इलेक्ट्रिक साधनांवर चालवण्याचा चंग बांधणारे गोवा हे राज्य असो किंवा अंबारी सारखी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात ल...

एसटीच्या खासगीकरणाचे अजुन एक पाऊल

इमेज
        आपल्या महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते.ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलींचे शिक्षण निव्वळ एसटीमुळे सुरु आहे.असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असि स्थिती आहे.अनेक खेडेगावातील,वस्ती, पांडे यात राहणारे पालक एसटीची सेवा आहे,म्हणून राहण्याचा ठिकाणाहून अन्य ठिकाणी शिकायला पाठवतात. जर एसटी बससेवा नसेल तर हे पालक खासगी वाहतूकदारांच्या भरवस्यावर त्यांना शिकायला पाठवणार नाहीत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. एसटी विद्यार्थ्यांना भांड्यात सुट देते जी खासगी वाहतूकदार कदापी देणार नाहीत. तसेच ज्या ठिकाणाहून एखादं दुसराच प्रवाशी मिळतो अस्या ठिकाणाहून सुद्धा खासगी वाहतूकदार आपली सेवा देणार नाहीत, तसेच एसटी मात्र लोकसेवेच्या आपल्या ब्रीदवाक्यामुळे प्रसंगी तोटा सहन करत या ठिकाणाहून देखील आपली सेवा देते त्यामुळे एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे.          मात्र मात्र ही महाराष्ट्राची जीवनदायिनी बंद करण्याचे शासनाचे प्रयोजन तर नाही ना ?असे वाटावे अस्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. सर्वसामान्य लोकांची लालपरीसुद्धा खासगी...

नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

इमेज
मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी, एसटीचा चाहता मात्र आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत, महाराष्ट्रातील नागपूर  या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे. माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे. या गृपवर सध्या  आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे  उपनगर असलेल्या दापोडीत  असणाऱ्या  वर्कशॉपमध्ये  BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत. एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे.    या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर+सिटर ही बससेवा होती. (लाल आणि पांढरा पट्टा असणाऱ्या बसेस) पुर्णतः स्लीपर असी सेवा नव्हती.जी कमतरता आता पुर्ण झाली आहे. तसे बघायला गेलो तर राजस्थ...

असी आहे आपली एसटी .....!

इमेज
   प्रातिनिधिक चित्र  मित्रांनो , आपल्या महाराष्ट्राची एसटी भारतातील एक प्रमुख सार्वजनिक सेवा आहे जी या एक जूनला 76 व्या वर्षात पदार्पण करत आहे आपल्या एसटी   महामंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या 12 प्रमुख प्रकारच्या बससेवा या आपल्या एसटीमार्फत पुरवल्या जातात . या 12  प्रमुख प्रकारातील एका प्रकारचे 5 उपप्रकार देखील पडतात .  आपली एसटी महामंडळ विविध प्रादेशिक विभाग आणि आगारमधून ही सेवा पुरवली जाते . चला तर एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून   जाणून घेवूया एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा . 1) परीवर्तन सेवा : एसटी महामंडळाची ही सर्वात स्वस्त आणि खेडोपाडी चालणारी सेवा आहे . या सेवेला लालपरी म्हणून देखील ओळखले जाते .  या सेवेचे विठाई , हरीत कुंभ ,  विद्यार्थी सेवा , एम एस बाँडी , साधी बस असे उपप्रकार पडतात . आता जाणून घेवूया याचे उपप्रकार ) विद्यार्थी   सेवा अ) हरीत कुंभ : नाशिकला कुंभमेळा असताना 2014-2015 ला एसटी महामंडळामार्फ...