पोस्ट्स

सप्टेंबर ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोनामुळे शेतीचे झालेले नुकसान

इमेज
सध्या आजमितीस सर्वच जग कोरोनामुळे धास्तावले आहे, हे सर्वश्रूत आहे. जगाचे व्यवहार प्रचंड प्रमाणात मंदावले आहेत. कोणीच यातून सुटलेला नाही.  जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणून ओळख असलेला शेतकरी वर्ग देखील यातून सुटलेला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे झालेले आहे. आपल्या भारताचा विचार करता कृषी क्षेत्राचा जिडीपी अन्य क्षेत्राचा विचार करता काहीस्या सकारात्मक असला तरी या कोरोनाच्या विळख्यातून कृषी क्षेत्र देखील सुटलेले नाही  . कोरोनामुळे लादण्यात आलेल्या लाँकडाऊनच्या काळात शहरी नागरीकांना घराजवळ भाजीपाल्याची सोय केलेली असली तरी , शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणात फायदा देणाऱ्या पिकांची निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना विविध नामांकित हाँटेलला  विविध रंगातील सिमला मिरच्यांचा विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा होत असतो. लाँकडाउनच्या काळात हाँटेल व्यवसाय पुर्णतः बंद असल्याने  शेतकऱ्यांना याचा फारच मोठा फटका बसला आहे.    शेतकरी जो नफा मिळवतो, त्यामध्ये हाँटेलला माल पुरवणे आणि आंतरराष्ट्रीय निर्यातीचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. द्राक्षे, आंबे, विविध मसाले, फळे