पोस्ट्स

एप्रिल ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाक रशिया संरक्षण करार

इमेज
   पाकिस्तान, भारताच्या पश्चिमेकडील सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारा देश.(त्यामुळेच शिया पंथीय बहुसंख्य असणाऱ्या गिलगीट बाल्टिस्तान मध्ये पाकिस्तान स्थानिक जनतेवर अत्याचार करत असल्याचा बातम्या येतात) भारताबरोबर 3हजार 323 किमीची सीमा असणारा भारताचा सर्वात जास्त चर्चित शत्रूत्व असणारा देश. युके या देशाकडून भारताबरोबरच  स्वातंत्र्य मिळूनदेखील लोकशाही न रुजलेला देश . 1971 पर्यत आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मात्र आता अर्थव्यवस्था खुपच नाजूक असणारा देश. सातत्याने सर्वच क्षेत्रात भारताबरोबर किंबहूना भारताच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणारा देश. ज्या देशाची राष्ट्रीय भाषा त्या देशातील कोणत्याही समुहाची भाषा नाही, असा देश म्हणजे पाकिस्तान.तर या पाकिस्तानबरोबर नुकताच रशिया या एकेकाळच्या भारताच्या अत्यंत जवळच्या मित्राने( आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी  मित्र अथवा शत्रू नसतो, हे 100% खरे आहे पूर्वी भारत रशिया आणि पाकिस्तान अमेरीका मित्र होते. आता भारत अमेरीका मित्र आहे तर पाकिस्तान रशिया यांच्यात मैत्री होत आहे. )  संरक्षणविषयक  करार केला आहे. भारताला