पोस्ट्स

ऑक्टोबर १, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

50 वर्षाचा सुवर्णकाळ

इमेज
    1972 आँक्टोबर 2 ही फक्त एक तारीख नाहीये. महाराष्ट्राचा एका नव्या युगात प्रवेश झाल्याची ती तारीख आहे. याच दिवशी मुंबईत दूरदर्शन केंद्राचा जन्म झाला.आज 2021 साली या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50वे वर्ष सुरु होईल. थोडक्यात मुंबईच्या वरळी या उपनगरात असणारे दुरदर्शन केद्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. त्यानिमित्ताने सर्व दुरदर्शन प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.       या 50 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे. समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजनासाठी एक  प्रयोग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या वाहिनीने पुढे अनेक वर्ष टिव्हीवर मराठी भाषेतील एकमेव वाहिनी म्हणून अधिराज्य गाजवले.1994साली या केंद्राने सह्याद्री हे नाव धारण केले. त्यानंतर ही वाहिनी सह्याद्री या नावाने ओळखायला लागली.आजमितीस मराठीत अनेक 24 तास चालणाऱ्या वाहिन्या आहेत. मात्र त्या कोणाचीही सर दुरदर्शन सह्याद्रीस येणार नाही. आता आतापर्यत अनेकांच्या दिवसाची अखेर सातच्या बातम्यांनी होत असे ( माझी अजून देखील होते)  बातमी कितीही महत्तवाची असली, इतर वाहिन्यांपेक्षा आधी दाखवत असलो तरी काहीही आवेश न दाखवता शांतपणे बातमी दर्शकापर्यत पोहचवया