पोस्ट्स

डिसेंबर १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवदूतांची काळी बाजू दाखवणारे पुस्तक, अशीही एक झुंज .........

इमेज
                 सर्वसाधारपणे वैद्यकीय  व्यवसायाला एका  परोपकारी नजरेतून बघितले जाते . लोकांची आयुष्ये वाचवणारा व्यवसाय म्हणून, यास  अन्य व्यवसायाच्या तुलनेत  एक प्रतिष्ठा आहे. औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जगभरात अनेक ठिकाणी देवदूतासमान मानण्यात येते .  मात्र अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय देशातील औषध निर्मिती कंपन्याचा नफाखोरीने या  लोककल्याणकारी  व्यवसायाला एका बाजूने काळवंडले आहे .  या काळ्या बाजूची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक  समाज या संस्थेच्या नाशिक येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांत प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ मृदुला बेळे यांनी ;लिहलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक म्हणजे अशीही एक झुंज.  जे मी . महाराष्ट्रातील जुन्या वाचनालयांची यादी केल्यास क्रमांक दोनचे जुने वाचनालय असणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या वाचनालयात नुकतेच वाचले . आपल्या मराठीत याविषयावरची पुस्तके फारच कमी आहेत अश्या अत्यंत मोजक्या संख्येने असलेल्या पुस्तकांचा मुकुटमणी म्हणून याकडे बघता येऊ शकते .,औषधनि