पोस्ट्स

जुलै ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान [भाग 11 ]

इमेज
      आपल्या भारतात  केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल , इंधनाचे वाढते दर  आणि या दरांमुळे वाढलेली महागाई , पावसाशी संबंधित  तसेच कोरोना लसीकरणाबाबत येणारी विविध आकडेवारी याच्या बातम्या माध्यमांमध्ये येताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये 3 घडामोडी घडल्या . यातील दोन गोष्टी प्रत्यक्ष आपल्या भारताशी संबंधित आहेत तर एका गोष्टीशी त्याचा अप्रत्यक्ष संबंध आहेत . त्यामुळे त्या गोष्टी  माहिती  अत्यावश्यक आहे .चला तर मग जाणून घेउया या त्या गोष्टींविषयी .    आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सुद्धा FATFच्या ग्रे यादीत टाकावे असी मागणी पाकिस्तानकडून जोरदारपणे करण्यात येत आहे. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतात सुद्धा त्याचा पैसा दहशतवादासाठी वापरतो, असी सबब त्यासाठी पाकिस्तानकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानने सयुक्त राष्टसंघाच्या सुरक्षा समितीतील कायमस्वरुपी सदस्यांकडे【P5】याबाबत मागणी केली आहे. लवकरच तो FATFकडे याबाबत तक्रार करेल.असी आशा आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ज्ञ करत आहेत.FATF च्या कार्यप्रणालीनूसार देशातील काळा पैस