अमेरिकन स्वातंत्र्यदिन विशेष
अमेरिका जगातल्या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ असणारा देश. अफगाणिस्तानमधील अशांतता असो , दक्षिण अमेरिका खंडातील राजकीय अस्थिरता असो, इराकमधील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला वाढण्यासाठी पूरक होईल अश्या वातावरणाची निर्मिती असो सध्याचे रशिया युक्रेनमधील युद्ध असो या आणि अश्या सारख्या घटनांचे मूळ शोधायला गेल्यास त्या सर्व घटना या अमेरिका या एकाच देशापाशी येऊन थांबतात , जगात बदलत्या हवामानाला साह्यभूत होणाऱ्या हरितवायूंचे उत्सर्जन कोणता देश अधिक करतो याचा आढावा घेतल्यास आपणस एका देशाचे कार्बन उत्सर्जन उर्वरित जगातील कित्येक देशांच्या उत्सर्जनपेक्षा अधिक आढळते तो देश म्हणजे अमेरिका जगात त्या देशातील एकूण लोकसंख्येच्या पेक्षा अधिक शस्त्रात्रे असणारा देश म्हणजे अमेरिका . जगात एखाद्या त्या देशावर आणि त्या देशाच्या नागरिकांवर असणाऱ्या कर्जाचा विचार करता देशाच्या जीडीपीच्या कितीतरी अधिक पट कर्ज असून देखील जो देश तेथील नागरिक अजून कर्ज घेत आहे तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशात अधिकृतपणे नाही तर किमान चोरट्या मार्गाने प्रवेश मि...