पोस्ट्स

शुभ वर्तमान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट !

इमेज
डिसेंबर महिन्यातील पाहिला रविवार जागतिक स्तरावर महिलांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा ठरला .   इराण या देशातील महिलांच्या त्रासास कारणीभूत असणाऱ्या मॉरल पोलीस   हा प्रकार समाप्त करत असल्याची   घोषणा देशातील सत्ताधिकारी वर्गाने करण्याचा तो दिवस आहे .   इस्लाममधील शिया हा पंथ ज्या देशाचा अधिकृत धर्म आहे असा जगातील एकमेव देश अशी ओळख असलेल्या इराणच्या सत्ताधिकरी वर्गाने घेतलेल्या या निर्ययाचे वर्णन   महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट असे केल्यास वावगे ठरणार नाही . पाकिस्तानबरोबर सीमा असणाऱ्या इराण या देशापासून सुरु होणाऱ्या आखाती प्रदेशात महिलांवर अनेक बंधने आज २०२२ साली देखील आहेत या अनेक बंधनांपैकी एक बंधन गळून पडून महिलांच्या स्वातंत्र्यबाबत एक पाऊल पुढे पडणें जगातील महिलांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे याच आखाती प्रदेशातील सौदी अरेबिया हा देश महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देणारा जगातील शेवटचा देश होता . हि बाब आपण लक्षात घेयला हवी वाहन ...

भारत पुन्हा एकदा जगाची आशा

इमेज
         भारताने स्वतंत्र झाल्यावर काही काळ जगाचे नेतृत्व केल्याचे दिसून येते  ज्यामध्ये भारतासारख्याच वसाहतवादाचा शिकार झालेल्या देशाचे महासत्तांच्या राजकारणात अजून नुकसान होऊ नये म्हणून उभारण्यात आलेल्या नामाची स्थापना करण्यात मोलाची भूमिका पार पडणे असो किंवा खेळाच्या माध्यमातून देशांसह एकमेकांशी संपर्क होऊन त्यांच्यातील वैरभावना कमी होऊ शकते या विचारातून आशिया खंडातील देशांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनाची सुरवात करणे . जगभरात सुरु असलेल्या विविध हिंसक आंदोलनात शांतात प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्टसंघातर्फे पाठवण्यत येणाऱ्या शांतिसेनेत मोठे योगदान देणे या त्यातील काही ठळक बाबी म्हणता येतील कालांतराने हे योगदान कमी होत गेले मात्र मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट करण्याविषयी कार्यक्रम सुरु करण्यात आला परराष्ट्र मंत्रालयाविषयी माध्यमात येणाऱ्या बातम्या बघितल्यास आपणस ही बाब सहजतेने लक्षात येते        तुर्की या देशाची राजधानी अंकारा येथे 10 जून 2022 रोजी भारत-तुर्की यान दोन देशाच्या परराष्ट्...

गर्वसे कहो हम भारतीय है

इमेज
    गर्वसे कहो हम  भारतीय है   हें वाक्य आपण अनेकदा बोलतो ऐकतो . आपल्या भारताच्या गौरवशाली परंपरा आणि आणि दैदिप्तमान कामगिरीच्या सम्मानार्थ हे वाक्य वापरतो नुकतीच घडलेली एक घटना हे वाक्य आपणस पुन्हा हे वाक्य पुन्हा एकदा म्हणण्याची संधी देत आहे  Chessable Masters online rapid chess tournament  बुद्भिबळाच्या सध्या सुरु असणाऱ्या स्पर्धेत १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रग्यानंदयांनी विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला पराभवाची चव  चाखायला लावणे हीच ती भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची घटना होय . या स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेरीस  २० मे  रोजी  त्यांनी हा भीम पराक्रम केला  आर प्रग्यानंद यांनी मॅग्नस कार्लसन याचा पराभव करण्याची ही  २०२२ या वर्षातील दुसरी वेळ   या आधी याच वर्षी २१ फेब्रुवारी रोजी   Airthings Masters.या स्पर्धेत  आठव्या फेरीत त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवाचे पाणी पाजायला भाग पडले. Tarrasch ...

भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट

इमेज
  भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट  धावायला लागल्याचे स्पष्ट करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . आपल्या वृत्त माध्यमांमध्ये सध्या राजकीय बातम्यांचा भडीमार सुरु असल्याने या देशाच्या प्रगतीच्या बातम्या काहिस्या मागे पडल्या , त्यांच्या हा अनुशेष भरून काढण्यासाठी या दोन घटनांची माहिती देण्यासाठी आजचे लेखन  तर भारतीय रेल्वच्या उत्पनाचा वाट्याच्या विचार करता प्रवाशी भाड्यापेक्षा अधिक उत्पन्न भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून मिळते मात्र धावणाऱ्या रेल्वचा विचार करता मालवाहतुकीच्या गाड्यांपेक्षा प्रवाशी गाडयांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याने  अनेक उद्योजक स्वस्त असणारा आणि रस्त्यावरील वाहतुकीचा ताण  कमी (पर्ययाने रस्त्यावरील अपघातांची संख्या सुद्धा कमी )करणाऱया रेल्वे मालवाहतुकीच्या पर्याय सोडून प्रदूषण करणाऱ्यारस्तेमाभारतीय र्गावरील मालवाहतुकीचा पर्याय स्वीकारताना दिसतात . ज्याचा परिणामस्वरूप रेल्वेचे उत्पन्न कमी होत आहेच तसेच रस्त्यावरून मोठं मोठी कंटनेरची वाहतूक होत असल्याने गंभीर अपघात ...

भारतीय रेल्वे बदलतीये !...

इमेज
        आपली भारतीय रेल्वे झपाट्याने बदलत आहे. येत्या काही वर्षात आपण बघीतलेली भारतीय रेल्वे ती हीच का? असा प्रश्न पडावा असे बदल भारतीय रेल्वेत होत आहेत. सगळ्या भारताच्या परीवहन व्यवस्थेचा कणा म्हणून भारतीय रेल्वे ओळखली जाते .आज 2022मध्ये देखील विमान प्रवास सर्वसामान्य भारतीयांंचा पुर्णतः अंगवळणी पडलेला नाही. तर अस्या भारतीय रेल्वेत येत्या वर्ष दीड वर्षात होणारे बदल बघूया  1)100% विद्यूतीकरण : भारतीय रेल्वेतून कर्बवायूचे उत्सर्जन शुन्य व्हावे.भारतीय रेल्वे पुर्णतः प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी भारतीय रेल्वे प्रकाश्याला लाजवेल या वेगाने आपल्या डिझेल इंजिनावर चालणाऱ्या मार्गाचे विद्युतीकरण करत आहे रेल्वेच्या अंदाजानुसार डिसेंबर 23 पर्यत रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण होईल. आजमितीस 75%पेक्षा अधिक रेल्वे विद्युत इंजिनावर धावत आहे विद्यूतीकरण व्हावे यासाठी इशान्य भारतात रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण त्याची प्रगती बघू शकतो. 2) डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर : भारतीय रेल्वेच्या महसुलातील खुप मोठा हिस्सा माल वाहतूकीचा आहे. मात्र रेल्वेचा जाळ्...

आगामी वर्षात भारताची खगोलशात्रातील भरारी

इमेज
            येत्या दशकांत  भारत खगोलशास्त्रात मोठी भरारी मारणार आहे अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात याविषयी  मोठा खुलासा नुकताच केला .भारत पुढील दहा वर्षात करणार असणाऱ्या ५  मोहिमांची त्यांनी यावेळी दिली ज्यामध्ये गगन यान मोहीम .आदित्य मोहीम भारताचे अवाक्ष स्थानक आणि भारताच्या शुक्राविषयक मोहीम यांच्या समावेश आहे आता बघूया या मोहिमा विस्ताराने पहिल्यांदा गगनयान विषयी बघूया          पुढील २०२२ च्या मध्यात भारत जीएसल्व्ही एम के ३ या प्रक्षेपण यानातून अंतराळात चाचणी करण्यासाठी काही सामनासह एक पेलोड उडवणार आहे तर २०२२ च्या अखेरीस भारतात  विकसित  करण्यात आलेल्या व्योममित्र या यंत्रमानवाला घेऊन त जीएसल्व्ही एम के ३  या प्रक्षेपण यानासह (रॉकेट )  एक पेलोड उडवणार आहे  तर २०२३ मध्ये चार अंतराळवीर घेऊन अंतराळयान  आहे या प्रकल्पाला गगन यान हे नाव देण्यात आले आहे या साठी ४ अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली असून यात एक महिला आहे...

भारताचा वाढता डंका !

आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर, एका उद्योगजकाच्या घराजवळ स्फोटके आढळण्याचा प्रकारात पोलीस दलातील काही लोक सहभागी असल्याची बातमी देण्यासाठी चडाओढ लागली असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत दुरग्रामी परीणाम करणारे बदल सुद्धा होत आहे. माझे आजचे लेखन त्यासाठी .      तर मित्रांनो गेल्या आठवड्याभरात तीन घडामोडींनी भारताचे परराष्ट्र सबंध नव्याने चर्चेत आले. त्यातील पहिली घडामोड म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासमोर चर्चैचा प्रस्ताव ठेवल्याचा दूसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा भारताबरोबर सबंध सुधारण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली. दुसरी घडामोड म्हणजे एकेकाळी भारतीय परराष्ट्र धोरणात अस्पृश्य समजलेल्या गेलेल्या इस्राइलबरोबर भारताने अँल्युमिनीयमचा वापर केलेली बँटरीच्या निर्मितीसाठी केलेले करार. तसेच तिसरी घडामोड म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला अमेरीकेने मान्यता द्यावी यासाठी अमेरीकेच्या सिनेटमधील (आपल्या लोकसभा समकक्ष) सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना सादर केलेला प्रस्ताव होय. आता बघूया या सर्...

अवकाश क्षेत्रातील उभरती महासत्ता भारत !

इमेज
            सन 2021 चा राष्ट्रीय विज्ञान दिन भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहला जाईल . कारण या दिवशी भारताने  आपण अवकाश क्षेत्रातील ऊभारती महासत्ता असल्याचे जगाला दाखवूंन दिले आहे . या दिवशी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली .   ब्राझील येथेही संशोधकांनी भारतीय संशोधकांच्या मदतीने स्वतः...

भारताचा शेजारी देशातील डंका

इमेज
आपल्या भारतात इंधनाच्या किमतीने मागील कित्येक वर्षातील किमतीचे रेकाँर्ड मोडले असताना, भारताच्या सभोवताली  आंतरराष्ट्रीय राजकारणातील  2  घटना नुकत्याच घडल्या. त्यातील एक घटना भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्व वाढवणारी आहे.तर दुसरी साधरण घटना आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन. पहिले साधरण घटना बघूया. तर मित्रांनो, आपल्या भारताच्या दक्षीणेला असणाऱ्या श्रीलंकेने संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकाराच्या बाबतीत आपली बाजू भारताने उचलावी, यासाठी साकडे घातले आहे . तसेच श्रीलंकेने त्यांचा दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांचा केंद्रीय विधीमंडळात भाषण करण्यास आधी परवानगी दिली असता नंतर मनाई केली . श्रीलंकेने यासाठी करोना संसर्ग पसरु शकतो, हे कारण पुढे केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार इम्रान खान त्यांचा काश्मीरविषयक राग तिथे आवळलू शकतात, जे श्रीलंकेला अडचणीचे ठरु शकते असे वाटल्याने श्रीलंकन सरकारने त्यांना मनाई केली,असो  त्याचप्रमाणे श्रीलंकेने त्यांचा देशात सिंहली आणि तामिळी असा संघर्ष टोकाला गेलेला असताना संघर्ष मिटवण्यासाठी उपाययो...

भारतीय रेल्वे विक्रमाचा वाटेवर

इमेज
  1फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली .ती म्हणजे डिसेंबर 2023 पर्यत भारतीय रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण करण्याचे. आतापर्यत अत्यंत प्रगत समजल्या गेलेल्या अमेरीका आदी देशात देखील रेल्वेचे पुर्णतः विद्यूतीकरण करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभुमीवर या घोषणेचे महत्व अन्यन्यसाधरण आहे. मात्र या घोषणेमुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे सध्या वापरात असलेल्या डिझेल इंजिनांचे काय होणार ? रेल्वेविषयक तज्ज्ञांच्या मते रेल्वे या डिझेल इंजिनाबाबत पुढील कार्यवाही होवू शकते. पहिल्या पर्यायानूसार  भारतीय रेल्वे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ किंवा आफ्रिकन देशातील रेल्वेंना डिझेल इंजिन विकू शकते. आपण काही महिन्यापूर्वीच बांगलादेश रेल्वेला दहा डिझेल इंजिने पाठवली होतीच. दुसऱ्या पर्यायानूसार जवाहारलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या एखाद्या संस्थेला ही इंजीने विकू.शकते. जवाहरलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या संस्थेला कमी अंतरासाठी वजनाने जास्त असणाऱ्या मालाची सातत्याने वाहतूक करावी लागते.त्यासाठी ही रेल्वे इंजिन वापरता येवू शकतील. तिसऱ्या पर्यायानुसार ...

भारतीय रेल्वे प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर

इमेज
            भारतीय रेल्वे वेगाने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत असल्याचे आपणास ज्ञात असेलच .याच श्रुंखलेत अजून दोन कड्या गुंफल्या गेल्या आहेत. त्याची माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन                 तर मित्रांनो, भारतीय रेल्वेतील आरामदायी सेवेसाठी ओळखण्यात येणाऱ्या राजधानी आणि शताब्दी रेल्वेसाठी यापुढे तेजस रेल्वेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोचेस वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे राजधानी रेल्वे आणि शताब्दी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तेजसच्या प्रवाश्यांना देत असलेल्या आधुनिक सेवा पुरवणे शक्य होईल.  या रेल्वेसाठी गेल्या पंधरा वर्षापासून एल एच बी कोचेस वापरले जातात. जे आता सर्व सामान्य रेल्वेत वापरले जात असल्याने राजधानी आणि शताब्दी रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक आरामदायी सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीप्रित्यर्थ भारतीय रेल्वेकडून 1969 आँक्टोबर 2पासून आरामदायी  प्रवाश्यासाठी शताब्दी सेवा पुरवण्यात येत आहे. आजमितीस 24 शताब्दी सेवांंच्या माध्यमातून 48 रेल्वे वापरण...