पोस्ट्स

जानेवारी ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मकर संक्रातीच्या निमित्ताने(भाग 2)

इमेज
  मकर संक्राती   हा सूर्याशी संबंधित सण असल्याचे आपणस माहिती आहेच . जो 14 जानेवारी किंवा   15 जानेवारीला साजरा करण्यात येतो सुर्याचे उत्तरायण आणि   मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो हे ही आपणास माहिती आहेच . त्यातील उत्तरायण आणि मकर संक्राती चा सहसंबंध आपण   याआधीच्या भागात बघितला . आता सूर्य मकर राशीत जातो म्हणजे जय होते ते बघूया ज्यांना उत्तरायण आणि मकर संक्रातीचा संबंदात माहिती वाचायची आहे ते या लेखाच्या खाली दिलेल्या लिंक वॉर क्लीक करू शकतात तर मित्रानो , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते या लंबवर्तुळाचा दोन केंद्रांपैकी एका केंद्राच्या ठिकाणी सूर्य असतो हे आपणास माहिती असेलच ( केप्लर चे नियम ) पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचे स्थान बदलते त्यामुळे काही दिवाशांनी पृथ्वीवरून दिसणारे आकाश बदलते . प्राचीन लोकांनी या वर्षभरत दिसणाऱ्या या आकाशाचे बारा भागात विभाजन केले आणि त्यास राशी असे नाव दिले . जसे म

मकर संक्रातीच्या निमित्याने ! (भाग 1)

इमेज
  15   जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण आहे . सुर्याचे उत्तरायण आणि   मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो . सुमारे हजार वर्षांपूर्वी सुर्याचा मकर राशीत प्रवेश होताना   उत्तरायण सुरु होत असे . मात्र पृथ्वीचा परांचन गतीमुळे यात फरक पडला आहे . सध्या 22 डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरवात होते .  तर दर 70 वर्षांनी मकर संक्रातीचा एक दिवस पुढे जातो . स्वामी विवेकानंद यांच्या जन्माचा वेळी 12 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येत असे , आता हा सण 14 किंवा 15 जानेवारीला येतो . हा फरक का पडतो ?  हे सांगण्यासाठी आजचे लेखन . सुर्य अथवा इतर ग्रह एखाद्या राशीत जातो , म्हणजे काय ?( माझी माहिती खगोलशास्त्राच्या दृष्टीने असेल , ज्योतिषशास्त्रानुसार नसेल याची नोंद घ्यावी ) माहिती मी याच लेखाच्या पुढील भागात देईल . तर   बघूया मकर संक्रांती आणि उत्तररायण यांचा सबंध उलगडणारी माहिती .         मित्रांनो , पृथ्वी स्वतःभोवती फिरते , त्यास परीभ्रमण म्हणतात , तर सुर्याभोवती