पोस्ट्स

मार्च ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आतातरी हवामानबदल हा मुद्दा चर्चेत येणार का?

इमेज
        सध्या उत्तर महाराष्ट्र बेमोसमी पावसाचा तडाखा सहन करतोय.या तडाख्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यथावकाश या नुकसानीचे पंचनामे होऊन   शेतकऱ्याना  योग्य तो मोबदला देखील मिळेल . मात्र गेल्या काही वर्षातील मार्च महिन्यातील घडामोडी बघता हा पाऊस काही नवीन घडामोडी राहिला नाहीये हा लेख वाचणारे सुद्धा सध्या पडणाऱ्या पावसाचा व्हिडीओ किंवा यावरील एखादे व्यंगचित्र फेसबुकवर अपलोड करून पुढील २०२४ या वर्षी फेसबुक मेमरी द्वारे त्यांचा अनुभव घेऊ शकतात किंवा मागील काही वर्षात ज्यांनी याविषयी फेसबुकवर काहीतरी अपलोड केले आहे ते याचा अनुभव घेतच असतील     मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या समस्येचा आपण अनुभव घेत असून देखील आपल्याकडून या समस्येला तोंड देण्यासाठी काही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचे चित्र समोर येत नाहीये दरवर्षी शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र जगभरात ज्या प्रमाणे सरकारे हवामानबदला या विषयावर बदलली त्याप्रमणे आपल्या देशात काहीही होत नाही मागील वर्षी २०२२ मध्ये  मे महिन्यात ऑस्टेलियायात गेली तीन   कालखंडे सत्तेत असणाऱ्या पक्षाला सत्त