पोस्ट्स

जून २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोन्याच्या दरात बदल होणार ?

इमेज
     सोने हा भारतीयांचासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. लग्नसराईत दागिने करण्यासाठी किंवा गुंतवणूकीचा सुरक्षीत पर्याय म्हणून भारतीय समाज सोन्याकडे मोठ्या आशेने बघतो.  जगात वैयक्तिक आणि मध्यवर्ती बँकेकडील एकत्रित सोन्याचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे सोने भारताने खरेदी केले आहे. जगभरात देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्याकडील गंजाजळीच्या सुरक्षीतेसाठी काही प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात. वैयक्तिकरीत्या सोने जगभरात काहीसे कमी खरेदी करण्यात येते. मात्र जगात असणाऱ्या या नियमाला भारतीय अपवाद आहेत. जगात सर्वात जास्त वैयक्तिक सोने भारतीयांनी खरेदी केले आहे. तर भारतीयांसाठी अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या  सोन्याच्या दरात आगामी नजिकच्या भविष्यकाळात बदल होण्याची दाट शक्यता आहे, आणि याला कारणीभूत आहे, जी7 परीषदेच्या 48व्या अधिवेशात घेण्यात आलेला निर्णय . आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात शक्तीशाली असणाऱ्या देशांचा समुह म्हणजे जी7. या जी7 संघटनेतील देशांचे 48वे अधिवेशन 26 ते 28 जूनदरम्यान जर्मनीत झाले.या अधिवेशनामध्ये रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा हेतूने, रशियावर सध्या आहेत, त्यापेक्षा कडक बंधने लादण्याचा, निर