पोस्ट्स

ऑक्टोबर १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या आत्महत्यांकडे बघणार कोण ?

इमेज
             मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी मध्ये कार्यरत नसलो,  तरी एसटीचा चाहता आहे एसटीच्या विविध योजनांचा फायदा घेत मी महाराष्ट्र पालथा घातला आहे . माझ्या या छंदामुळे मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटी प्रेमींच्या समाज माध्यमांवरील विविध गृपचा सदस्य आहे गेल्या काही दिवसांच्या या गृपवरील पोस्ट बघितल्या तर आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात येते ती म्हणजे या गृपवर  दोन ते तीन दिवसाच्या अंतरावर किमान एका एसटीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवले असल्याची पोस्ट येत असते .           आतापर्यंत सुमारे दहा ते पंधरा एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे . ज्यांनी जीवन संपवले त्या पैकी बहुसंख्य हे एसटीचा कणा  म्हणता येतील अश्या वाहक आणि चालक या क्षेणीतील कर्मचारी होते .उच्चपदस्थ अथवा एसटीच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी फारच तुरळक प्रमाणात आत्महत्या केल्या आहेत  या सर्व कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या आणिउशिराने मिळणाऱ्या पगारामुळे आत्महत्या केली आहे . या आत्महत्या झाल्यावर संबंधित आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास त्या पुरती ती बातमी होते मात्र त्यानंतर सर्वकाही पूर्ववत होते जणूकाही काही घडलेच न