पोस्ट्स

जून २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळ्या पर्वानंतरची 46 वर्षे

इमेज
    आजपासून 46 वर्षापुर्वीची गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एका काळ्या पर्वाची सुरवात होती ती. ज्यामध्ये तत्कालीन माध्यमांचा स्वातंत्र्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात संकोच करण्यात आला होता. वृत्तपत्रात काय छापायचे?काय छापायचे नाही. याचा निर्णय वृत्तपत्रातील संपादकीय मंडळ न घेता ते वर्तमानपत्राचे कार्यालय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे, त्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेत असत. सत्ताधिकाऱ्यांचे सर्व विरोधक बंदीवासात बंदी होते. उत्तर भारतात मोठे पुरुष सोडा, लहान मुलांच्या देखील नसबंदी शस्त्रक्रिया जोरात सुरु होत्या.नागरीकांचे मुलभूत हक्क मोठ्या प्रमाणात गोठवण्यात आले होते. गुन्हेगारांचे निर्दलन करण्यासाठी अनेक कडक कायदे करण्यात आले होते.ज्याचा काहीसा गैर वापर देखील होत होता. विरोधक नसल्याने संविधानातील महत्तवाचे बदल या काळात करण्यात आले.आज या कालखंडास आपण आणिबाणी म्हणून ओळखतो. आणिबाणीची सुरवात होवून आज 25जून 2021रोजी  46 वर्षे झाली. सन 1975 जून 25 रोजी सुरू झालेली आणिबाणी पुढे  तेवीस महिने सुरु होती.          आणिबाणी उठल्यावर झालेल्या निवडणूकीत क्राँग्रेस पक्षाचा पराभव झाला.