पोस्ट्स

जुलै ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एसटीचे स्वागतार्ह्य निर्णय

इमेज
आपल्या महाराष्ट्रात राजकीय आखाडा रंगलेला असताना आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या आपल्या एसटीबाबत दोन सुखद घडामोडी घडल्या . एका गोष्टीची प्रत्यक्ष अंमलबाजवणी सुरु झाली तर दुसऱ्या गोष्टीबाबत निर्णय घेण्यात आला . या दोन्ही गोष्टींमुळे आपली महाराष्ट्राची एसटी भूतकाळातील कटू आठवणी विसरून नव्या काळाचे आव्हान स्वीकारण्यास सक्षम झल्याचे दिसून येत आहे एक गोष्ट समस्त महाराष्ट्रासाठी आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागासाठी मर्यदित अशी योजना आहे पहिल्यांदा समस्त महाराष्ट्रासाठी असणारी योजना बघूया  तर  १ जूनपासून इलेट्रीक बसेसचे यशस्वी संचालन करत असलेल्या आपल्या एस्टीनेने अधिकच आधुनिक होण्यास सुरवात केली आहे सध्याच्या काळातील इ मनीचा वाढता वापर बघता आता एसटीचे तिकीट काढण्यासाठी फोन पे गूगल पेचा वापर आता करता येणार आहे त्यामुळे एसटी प्रवाश्यात रोख रक्कम बाळगण्याच्या त्रासातून प्रवाशाची सुटका होणार आहे . आपल्या एसटीचे ३५० हुन अधिक आगरे आहेत तसेच सुमारे १००० बसस्थानके आहेत छोटोमोठे थांब्याचा तर विचारच करायला नको . तसेच एसटीमध्ये हजारो कंडक्टर आहेत ज्यांचा मार्फत आपण रोख पैसे देऊन