पोस्ट्स

ऑगस्ट १८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हा विक्रम अभिमानास्पद नाही !

इमेज
                सध्या भारतीय करोनाच्या धास्तीत जगत असताना त्याही पेक्षा धक्कादायक बातमी नुकतीच भारतीय हवामान खात्यामार्फत जाहिर करण्यात आली . जेव्हापासून हवामानाच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली, त्यापासूनच्या आतापर्यतचा विचार केला असता जमू काश्मीर  या केंद्रशासित प्रदेशमधील कुपवारा  येथे आँगस्ट महिन्यातील सर्वाधिक 17 आँगस्ट रोजी  तापमान नोंदवले गेले , तसेच प्रमाणे श्रीनगर येथे देखील गेल्या 39 वर्षातील सर्वाधिक तापमान  नोंदवले गेले आहे.अशी ती बातमी होती .सध्याच्या हवामान बदलाच्या काळात या बातमीला विशेष महत्त्व आहे .                 गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण हवामानात होणारे बदल तिव्रतेने अनुभवत आहोत . नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात पडणारा पाउस , हिवाळ्यात पडणारी असाह्य थंडी, उन्हाळ्यात नोंदवलेले जाणारे प्रचंड तापमान, पावसाची येण्याची तारीख उशीरा होणे , कमी वेळात जास्त पाउस पडण्याचा प्रसंगामध्ये वाढ होणे यासारखे बदल आपण अनुभवत आहोत . मात्र या बदलांना सामोरे जाताना ज्या गतीने पाउले उचलायला पाहिजे , त्या गतीने आपण पाउले उचलत नाहीये , दुर्दैवाने असो .                    भारत सोडून ईत