पोस्ट्स

ऑक्टोबर ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नांदूर नाका परिसरात झालेल्या अपघाताने उपस्थित झालेले प्रश्न

इमेज
      नाशिककरांची शुक्रवार ८ ऑक्टोबरची सकाळ उघडली ती नांदूर नाका परिसरात झालेल्या एका मोठ्या जीवघेण्या अपघाताच्या बातमीने . एका खासगी बसवातूकदारच्या यवतमाळ ते मुबई दरम्यान धावणाऱ्या एका बसला पहाटे पावणेपाचच्या सुमारास अपघात होऊनआग  लागण्याने होरपळून १० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती . वरातीमागून घोडे या न्यायाने याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र या चौकशीतून काही चुका समोर आल्यातर त्या चुकांची पुनरावर्ती टाळण्यासाठी काही उपाययोजना होतात का ? हे बघणे महत्त्वाचे  आहेत . याच्या आधी देखील अश्या प्रकारचे अनेक अपघात झाले आहेत त्यांच्या अपघाताची देखील चौकशी झाली आहे मात्र या  चौकशी अहवालात जे  सांगितले आहे याची अंमलबाजवणी न झाल्याने सदर अपघात झाला असे माझे स्पष्ट मत आहे       मुळात आपल्याकडे बस बांधणीत खूपच फरक दिसतो उदाहरणादाखल आपण महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात , नॉर्थ वेस्ट कर्नाटक , या चार एसटी महामंडळाच्या बसेस बघूया मी जरी या चार बसेसचे उदाहरण देत असलो तरी पळसाला पाने तीनच  या न्यायाने आपण भारतातील कोणतंही बस वाहतूकदार या  ठिकाणी घेऊ शकतो       तर मित्रानो