पोस्ट्स

ऑगस्ट १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावधान वणवा पसरतोय ....... !

इमेज
               आपल्या भारतातील जवळपास सर्वच माध्यमे अफगाणिस्तान तालिबानविषयक बातम्या दाखवण्यात मग्न असताना हे संकट कमी वाटावे असे एक संकट पश्चिम युरोप आणि उत्तर आफ्रिका, आशिया खंडाचा अति ईशान्येकडील भाग  या भूभागात घोंगावत आहे . ते आहे प्रयत्नांची शर्थ करून देखील विझता न  विझणारी वणव्याची मालिका . मी आपणास तुर्की आणि ग्रीस मधील वणव्याविषयी पंधरा दिवसापूर्वी सांगितले होतेच.  ती आग अजूनही पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही.  उलट भूमध्य समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ती अजून वेगाने पश्चिमेकडे पसरत आहे हा लेख लिहीत असताना ( 18 ऑगस्ट सायंकाळ ) ही  आग भूमध्य समुद्राला लागून असणाऱ्या अल्जेरिया (आफ्रिका खंडातील क्षेत्रफळाने पहिल्या क्रमांकावरचा देश ) मोरोक्को , या आफ्रिका खंडातील देशांबरोंबर युरोप खंडातील इटली , फ्रांस स्पेन पोर्तुगाल या देशात पसरलेली  आहे जर्मन सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या DW या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार आतापर्यंत या वणव्याने सुमारे 4000 हेक्टर जमिनीवरील जंगले राखेच्या डोंगरात परिवर्तित केलेली आहे आणि ही  आग ताशी 4 किलोमीटर वेगाने पसरत आहे तर आशिया खंडाच्या अति ई