पोस्ट्स

बदलता भारत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे

इमेज
जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिगोष्ट  असणे हे याचे उत्तम उदाहरण आहे . तोच नियम याला देखील लागू होतो काही व्यक्ती आपल्याला  असणाऱ्या अडचणींबाबत काहीही त्रास व्यक्त ना करता त्यास आनंदान...

भिकारी, ते मोठा निर्यातदार भारताचा गव्हाचा प्रवास

इमेज
  सध्या जगातील मोठ्या 7 अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समुह अर्थात जी 7 या संघटनेतील देश भारतावर काहीसे नाराज आहेत, आणि याला कारणीभूत आहे, भारताच गहु निर्यात थांबवण्याचा निर्णय. आज भारत जगातील प्रमुख गहु उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. त्याने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात गव्हाचे दर वाढू शकतात.ज्यामुळे आधीच  जगभरात चढे असणारे खाद्यपदार्थाचे दर अजूनच वाढतील, असी भिती हे देश व्यक्त करत आहेत.     भारत एकेकाळी स्वतःच्या देशातील नागरीकांची भुक भागवण्यासाठी अमेरीकेपुढे कटोरा पुढे करत गव्हाची भिक मागणारा देश आज जगातील अनेक देशांना गहु निर्यात करतोय. त्याकाळी अमेरीकेत नित्कृष्ट समजल्या जाणाऱ्या आणि प्राण्यांना खाउ घातला जाणारा गहु अर्थात मिलो गहु अमेरीका अत्यंत तोऱ्यात आपणास अपमानास्पद अस्या अटी  घालून अमेरीका  देयची. आज तोच भारत जगात ताठ मानेने गहु निर्यात करतोय. भिकारी ते मोठा निर्यातदार हा भारताच्या गव्हाबाबतचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे. यासाठी भारताचे सर्व पंतप्रधान आणि सर्व खासदार,शासकीय यंत्रणेतील लोक, कृषी शास्त्रज...

महाराष्ट्रातील रेल्वे झपाट्याने बदलाचा मार्गावर !

इमेज
       जगात विस्ताराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणारी , सर्वाधिक कर्मचारी असणारा जगातील पहिल्या क्रमांकाच्या सार्वजनिक उद्योग पूर्णतः आपली भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल इतक्या मोठ्या वेगाने बदलतीये . त्याचाच एका भाग म्हणून भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्रातील रेल्वे सुद्धा झपाट्याने कात टाकत आहे भारतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या या बदलांमध्ये नॅरोगेज आणि मीटरगेजच्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज या रेल्वेमार्गात रूपांतर करणे डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे विद्यतीकरण करणे आदी कामाचा समावेश करावाच लागेल   आपल्या महाराष्ट्रातील अकोला ते खांडवा या बहुचर्चित रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या या मार्गाचे जज बदलायचे काम खूपच आधी सुरु झाले होते मात्र हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने आणि गेज परिवर्तनासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीचे हस्तांतर करण्यास वन खात्याने लाल सिगनला दिल्याने या मार्गाचे काम रखडले होते मात्र अखेर आठवड्यापूर्वी वन खात्याने या बाबतच्या जमीन हस्तानं...

भारतीय रेल्वे बदलतीये !...

इमेज
        आपली भारतीय रेल्वे झपाट्याने बदलत आहे. येत्या काही वर्षात आपण बघीतलेली भारतीय रेल्वे ती हीच का? असा प्रश्न पडावा असे बदल भारतीय रेल्वेत होत आहेत. सगळ्या भारताच्या परीवहन व्यवस्थेचा कणा म्हणून भारतीय रेल्वे ओळखली जाते .आज 2022मध्ये देखील विमान प्रवास सर्वसामान्य भारतीयांंचा पुर्णतः अंगवळणी पडलेला नाही. तर अस्या भारतीय रेल्वेत येत्या वर्ष दीड वर्षात होणारे बदल बघूया  1)100% विद्यूतीकरण : भारतीय रेल्वेतून कर्बवायूचे उत्सर्जन शुन्य व्हावे.भारतीय रेल्वे पुर्णतः प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी भारतीय रेल्वे प्रकाश्याला लाजवेल या वेगाने आपल्या डिझेल इंजिनावर चालणाऱ्या मार्गाचे विद्युतीकरण करत आहे रेल्वेच्या अंदाजानुसार डिसेंबर 23 पर्यत रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण होईल. आजमितीस 75%पेक्षा अधिक रेल्वे विद्युत इंजिनावर धावत आहे विद्यूतीकरण व्हावे यासाठी इशान्य भारतात रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. रेल्वेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण त्याची प्रगती बघू शकतो. 2) डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर : भारतीय रेल्वेच्या महसुलातील खुप मोठा हिस्सा माल वाहतूकीचा आहे. मात्र रेल्वेचा जाळ्...

हे चाललंय काय ?

इमेज
            मध्ययुगात जेव्हा रोम जळत होते लोक आपला जीव वाचण्यासाठी सैरावैरा पळत होते  तेव्हा तत्कालीन रोमचा सत्ताधीश निओ आपल्या प्रसादलात निवांतपणे संगीताचा आस्वाद घेत होता. फ्रान्समध्ये सोळाव्या लुईच्या काळात जेव्हा सर्वसामान्य जनता परिस्थितीने अत्यंत त्रासलेली होती . त्यावेळी तेथील राणीने त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.  सध्या महाराष्ट्रात आणि देशात ज्या प्रकारे सताधीश वर्ग आणि विरोधक जनतेच्या मूलभूत प्रश्नापासून दूर जा, त मी मारल्यासारखे करतो,  तू रडल्यासारखे कर,  या पद्धतीचा जो खेळ कर करत आहे , त्यामुळे हे आठवल्याशिवाय राहत नाही . दुर्दैवाने या खेळामध्ये राजा तू चुकत आहेस  हे सांगायला कोणी ब्रुटस नाहीये मात्र त्यामुळे मात्र जनता न मरता मेल्यासारखीच होत आहे ज्याकडे कोणाच्याच लक्ष नाहीय।                   गेल्या काही दिवसांपासून देशातील आणि राज्यातील शासनकर्ते आणि विरोधक यांनी जनहितार्थ कोणती कामे अथवा आंदोलने केली? याची यादी केली असता आपणास याचे सहजतेने उत्तर मिळते . उठता ...

भारत युके संबंध नव्या वळणावर !

इमेज
             सध्या आपल्या भारताचे अन्य राष्ट्रांबरोबरचे असणारे संबंध नव्या वळणावर आहेत याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत आणि युनाटेड किंग्डम या देशांमध्ये घडली . युके  असे संक्षिप्त नाव असणाऱ्या या देशाला आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लड असे म्हणतात वास्तविक युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड असे पूर्ण नाव असणाऱ्या या देशातील  चार भागांपैकी एक भाग म्हणजे इंग्लंड होय असो              तर मित्रानो सन 2004 पासून नित्यनियमाने भारतीय नौदल दल आणि युकेची रॉयल नेव्ही यांच्यामध्ये होणारी  कोकण एक्सरसाईज नुकतीच इंग्लिश चॅनेल या भागात झाली,  युके आणि फ्रांस या दोन देशांमध्ये असणाऱ्या खाडीला इंगलीश चॅनेल म्हणतात (दोन भूभागाच्या मध्ये आणणाऱ्या  अरुंद पाण्याचा पाण्याला किंवा  म्हणतात ) या वर्षी झालेल्या कोकण एक्सरसाईजमध्ये भारताकडून आयएनएस तब्बर आणि युनिटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड या देशाकडून एचएमएस  वेस्टमिनिस्टर या दोन युद्धदनौकानदाम्यान झाली य...

भारताचा वाढता डंका !

आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर, एका उद्योगजकाच्या घराजवळ स्फोटके आढळण्याचा प्रकारात पोलीस दलातील काही लोक सहभागी असल्याची बातमी देण्यासाठी चडाओढ लागली असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत दुरग्रामी परीणाम करणारे बदल सुद्धा होत आहे. माझे आजचे लेखन त्यासाठी .      तर मित्रांनो गेल्या आठवड्याभरात तीन घडामोडींनी भारताचे परराष्ट्र सबंध नव्याने चर्चेत आले. त्यातील पहिली घडामोड म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासमोर चर्चैचा प्रस्ताव ठेवल्याचा दूसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा भारताबरोबर सबंध सुधारण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली. दुसरी घडामोड म्हणजे एकेकाळी भारतीय परराष्ट्र धोरणात अस्पृश्य समजलेल्या गेलेल्या इस्राइलबरोबर भारताने अँल्युमिनीयमचा वापर केलेली बँटरीच्या निर्मितीसाठी केलेले करार. तसेच तिसरी घडामोड म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला अमेरीकेने मान्यता द्यावी यासाठी अमेरीकेच्या सिनेटमधील (आपल्या लोकसभा समकक्ष) सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना सादर केलेला प्रस्ताव होय. आता बघूया या सर्...

अवकाश क्षेत्रातील उभरती महासत्ता भारत !

इमेज
            सन 2021 चा राष्ट्रीय विज्ञान दिन भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहला जाईल . कारण या दिवशी भारताने  आपण अवकाश क्षेत्रातील ऊभारती महासत्ता असल्याचे जगाला दाखवूंन दिले आहे . या दिवशी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली .   ब्राझील येथेही संशोधकांनी भारतीय संशोधकांच्या मदतीने स्वतः...

भारत माँरीसियस व्यापार नव्या वळणावर !

इमेज
        आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी नूकताच आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला. आफ्रिका खंडात वाढत जाणाऱ्या चीनच्या वर्चस्व्याला शह देण्यासाठी ही रणनिती उपयोगी पडू शकते, असे परराष्ट्र धोरणाविषयीचे तज्ज्ञांचे मत आहे.या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा  विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.   भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे. मात्र आफ्रिका खंडातील देशांबरोबरचा हा  या प्रकारचा पहिलाच करार आहे. चीनने याच प्रकारचा करार माँरीसियस बरोबर जानेवारी 2021 रोजी केला आहे....

मी बघीतलेला बदलता ग्रामीण महाराष्ट्र

इमेज
      मनुष्याला अनुभवातून, प्रत्यक्ष बघून जे ज्ञान होते. ते शंभर पुस्तके वाचून होणाऱ्या ज्ञानापेक्षा कैकपटीने उत्तम असते, असे आपणाकडे म्हटले जाते.याचा अनुभव मी नूकताच 14 फेब्रुवारीरोजी केलेल्या नाशिक ठाणे प्रवासादरम्यान घेतला. तो आपणापर्यत पोहोचवून आपणास देखील त्यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी आजचे लेखन .     तर मित्रांनो, गेल्या रविवारी 14 फेब्रुवारी रोजी मी फिरण्याचा उद्द्येश्याने नाशिक -जव्हार - भिवंडी -ठाणे - इगतपूरी -नाशिक असा एसटीने चक्री मार्गाने प्रवास केला. या सबंध प्रवासात रस्ता छोटा असो अथवा मोठा असो तूरळक अपवाद वगळता सर्व रस्ते खड्डे विरहीत होते. अगदी मोखाडा, वाडा, या आदीवासी समजल्या जाणाऱ्या भागातील रस्तेसुद्धा खड्डेविरहीत होते. तसेच पुर्वी या भागातील ज्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत असे, त्या ठिकाणी जसे, भिवंडी शहर , कल्याण फाटा आदी सर्व ठिकाणी मुंबई महानगर विकास प्राधीकरण (MMRDA) च्या माध्यमातून उड्डाणपूल बांधून नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली आहे. ज्यामुळे वाहतूक सुद्धा जलद झाली आहे. जलद वाहतूक झाल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होत आहे, हे नाकार...

भारतीय रेल्वे विक्रमाचा वाटेवर

इमेज
  1फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली .ती म्हणजे डिसेंबर 2023 पर्यत भारतीय रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण करण्याचे. आतापर्यत अत्यंत प्रगत समजल्या गेलेल्या अमेरीका आदी देशात देखील रेल्वेचे पुर्णतः विद्यूतीकरण करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभुमीवर या घोषणेचे महत्व अन्यन्यसाधरण आहे. मात्र या घोषणेमुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे सध्या वापरात असलेल्या डिझेल इंजिनांचे काय होणार ? रेल्वेविषयक तज्ज्ञांच्या मते रेल्वे या डिझेल इंजिनाबाबत पुढील कार्यवाही होवू शकते. पहिल्या पर्यायानूसार  भारतीय रेल्वे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ किंवा आफ्रिकन देशातील रेल्वेंना डिझेल इंजिन विकू शकते. आपण काही महिन्यापूर्वीच बांगलादेश रेल्वेला दहा डिझेल इंजिने पाठवली होतीच. दुसऱ्या पर्यायानूसार जवाहारलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या एखाद्या संस्थेला ही इंजीने विकू.शकते. जवाहरलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या संस्थेला कमी अंतरासाठी वजनाने जास्त असणाऱ्या मालाची सातत्याने वाहतूक करावी लागते.त्यासाठी ही रेल्वे इंजिन वापरता येवू शकतील. तिसऱ्या पर्यायानुसार ...

भारतीय रेल्वे प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर

इमेज
            भारतीय रेल्वे वेगाने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत असल्याचे आपणास ज्ञात असेलच .याच श्रुंखलेत अजून दोन कड्या गुंफल्या गेल्या आहेत. त्याची माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन                 तर मित्रांनो, भारतीय रेल्वेतील आरामदायी सेवेसाठी ओळखण्यात येणाऱ्या राजधानी आणि शताब्दी रेल्वेसाठी यापुढे तेजस रेल्वेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोचेस वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे राजधानी रेल्वे आणि शताब्दी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तेजसच्या प्रवाश्यांना देत असलेल्या आधुनिक सेवा पुरवणे शक्य होईल.  या रेल्वेसाठी गेल्या पंधरा वर्षापासून एल एच बी कोचेस वापरले जातात. जे आता सर्व सामान्य रेल्वेत वापरले जात असल्याने राजधानी आणि शताब्दी रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक आरामदायी सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीप्रित्यर्थ भारतीय रेल्वेकडून 1969 आँक्टोबर 2पासून आरामदायी  प्रवाश्यासाठी शताब्दी सेवा पुरवण्यात येत आहे. आजमितीस 24 शताब्दी सेवांंच्या माध्यमातून 48 रेल्वे वापरण...

भविष्याचा वेध घेणारी ....... नॅशनल रेल पॉलिसी

इमेज
                              भारतीय रेल्वे ही प्रचंड संख्येने बदलत आहे ,  हे आपण जाणतातच . त्याच मालिकेत भविष्यात कोणकोणते बदल होणार आहे ?  याची झलक देणारी नॅशनल रेल पॉलिसीचा मसुदा  नुकतीच केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आला आहे . ज्यामध्ये पुढील  30 वर्षाचा आढावा घेऊन रेल्वमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत . याची  रूपरेखा सांगण्यात आली आहे .   या मसुद्याचे  तीन  भागात विभाजन करण्यात आले आहे . जे  2024 पर्यंत करावयाची कामे,  2030 पर्यंत करावयाची कामे , आणि 2050 पर्यंत कामे असे विभाजन करण्यात आले आहे . केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मसुद्यामध्ये  2024  आणि 2030 पर्यंतचा कामाचा समावेश करण्यात आला आहे  यातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत  1).महामार्गाच्या बाबतीत ज्याप्रमाणे सुवर्णभूज चतुष्कोण तसेच पूर्व पश्चिम मार्ग आणि उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे , त्या धर्तीवर देशातील चार  प्रमुख महानगरे असणारे दिल्ली मुबई , चेन्नई...

भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकताना

इमेज
          मित्रानो , भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल या वेगाने कात टाकत असल्यानेच आपणास माहिती असेलच.खचितच असा एखादा आठवडा जातो , ज्यामध्ये भारतीय रेल्वेविषयी एकही बातमी चर्चस येत नाही . केंद्र सरकारच्या सर्वाधिक वेगाने घडामोडी ज्या मंत्रालयात घडतात ते मंत्रालय म्हणजे रेल्वे मंत्रालय , असे म्हटल्यास  अतिशोयोक्ती होणार नाही . दर आठवड्यात किमान एकतर रेल्वे विषयक बातमी ही कानावर येतेच , गेल्याच आठवड्यात तीन घडामोडी घडल्या .  मात्र पारंपरिक माध्यमातून या विषयी फारसे सांगण्यात न आल्याने त्या विषयी सांगण्यासाठो आजचे लेखन             तर मित्रानो प्रदूषण कमी व्हावे या हेतूने भारतीय रेल्वे आपल्या सर्व मार्गाचे वेगाने विद्युतीकरण करत आहे . हे आपणास माहिती आहेच . त्याच  कार्यक्रमातर्गत चालवलेल्या  उपक्रमामुळे रेल्वेचा पश्चिम मध रेल्वे हा विभाग पूर्णतः विद्यतीकरण झालेला पहिला विभाग झालेला आहे , तर उत्तर पश्चिम विभागात असणाऱ्या राजस्थानातील दिल्ली ते जयपूर आणि जयपूर ते अजमेर या दोन महत्त्वाच्या  मार्ग...

भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकणारी रेल्वे

इमेज
आपल्या अजस्त्र असणाऱ्या भारतीय रेल्वेत सध्या अनेक बदल होत आहेत. हे आपण जाणतातच त्यातील काही बदल सकारात्मक  स्वरुपाचे आहेत . तर काहींना काहीसी नकारात्मक छटा आहे. हेही आपणास ज्ञात असेलच . याच सकारात्मक आणि नकारात्मक बदलाच्या खेळात दोन महत्तपुर्ण बदल भारतीय रेल्वेत नुकतेच झाले. अन्य बातम्यांमध्ये मुख्य धारेतील माध्यमे गुंतून गेली असल्यामुळे त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. मात्र हे बदल सगळ्यांना माहिती असणे आवश्यक असल्याने ते सांगण्यासाठी आजचे लेखन सर्व प्रथम नकारात्मक छटा असणारे लेखन बघूया . तर मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या 16 उपकंपन्या आहेत. (या उप कंपन्याची माहिती या आधी 2ब्लाँग पोस्टद्वारे शेअर केली आहेच. ज्यांना ती परत वाचायची त्यांचासाठी या लेखाच्या खाली त्याचा लिंक परत देत आहे.) त्यातील एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे, यासाठी 2003 साली स्थापन करण्यात ...

भारताचा इतर देशात डंका

इमेज
                         सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे अनेक काहिस्या निरुपद्रवी, मुद्यांवर चर्चेची गुऱ्हाळे चालवत असताना,समस्त भारतीयांची मान गर्वाने ताठ व्हावी , अस्या दोन घटना घडल्या. त्याविषयी पारंपारीक माध्यमांमध्ये फारसी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                  तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मोक्याचा ठिकाणी वसलेल्या आणि सन 2008 पासून चीन ज्या क्षेत्रात विविध गोष्टींमार्फत आपले अस्तिव दाखवून देत आहे, अस्या लाल समुद्र आणि एडनच्या आखात तसेच अरबी समुद्र  यांच्या मध्ये नकाश्यामध्ये  गेड्यांचा शिंगाप्रमाणे भासणाऱ्या  भुप्रदेशातील अर्थात हाँन आँफ आफ्रिका या भागातील नागरीकांना  भारताच्या नौदलामार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.भारतीय नौदलाच्या आय एन एस ऐरावत या जहाजामार्फत हाँन आँफ आफ्रिका भागातील नागरीकांना 155 मेट्रीक टन गव्हाचे पीठ, 65 मेट्रीक टन तांदूळ आणि 50 मेट्रीक टन साखर असा एकदंरीत 270 मेट्रीक टन अन्नसाठा नु...

भारत बांगलादेश मैत्री नव्याने उमलताना

इमेज
      बांगलादेश, दक्षिण आशियातील असा देश जो ज्याची आपल्या भारताबरोबर सर्वाधिक लांबीची सीमा आहे , ज्या देशातील 8  प्रशासकीय विभागापैकी 6 प्रशासकीय विभागात आपणास जमिनीवरून चालत जाता येते . तर एका प्रशासकीय विभागता आपण समुद्रमार्गे सहजतेने जाऊ शकतो . ज्या देशाची अधिकृत भाषा आपल्या एका राज्यची देखील राज्यभाषा आहे . तसेच ज्याच्या आर्थिक क्षमतेबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या एका अहवालामुळे भारताची आणि बांगलादेशच्या आर्थिक आर्थिक क्षमतेविषयी विविध चर्चाना भारतात सुरवात झाली  तर अश्या बांगलादेशाबरोबर आपल्या भारताचे  सहकाऱ्यांचे नवे पर्व सुरु झाले आहे .आपल्या भारताच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या ईशान्य भारताच्या विकासास ठी तसेच  आंतराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढवण्याबरोबरच स्वविकासात देखील बांगलादेश भारताला मदत करत आहे आणि स्वतःचा विकास देखील करत आहे . मराठी माध्यमात या विषयी अत्यंत कमी बोलले गेल्याने जे जे आपणासी ठाव ते ते सकळांसी सांगावे , शहाणे करून सोडावे सकल जण या समर्थांच्या उक्तीनुसार या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन   सर्वप्रथम भारतच...