पोस्ट्स

जुलै ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल

इमेज
आपल्या भारतात तसेच महाराष्ट्रात अनेक राजकीय लाथ्या उथाळ्यांनी वातावरण भंडावून सोडले असताना भारताच्या पश्चिमेकडील एका देशात फार तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील जनता वेगाने मध्ययुगाकडे वाटचाल करत आहे. जर मध्ययुगात हा देश पुर्णतः पोहोचला तर त्याचे विपरीत परीणाम काश्मीर सह समस्त भारताला भोगावे लागतील. सध्या विविध आंतरराष्ट्रीय माध्यमात येणाऱ्या बातम्यांचा विचार करता ही स्थिती येत्या काही आठवड्यात फार उशीराचा विचार केला तर महिन्यात येवू शकते.मात्र  टायटँनिक या चित्रपटात दाखवलेल्या प्रमाणे जहाज बुडत असताना देखील शांतपणे संगीत वाजवण्यात दंग असलेल्या लोकांप्रमाणे भारतीयांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्याने याबाबत आपणाकडे विचारमंथन करण्यात येत नाहीये.(तसा तो आपला राष्ट्रीय स्वाभाव आहे. भारताच्या इतिहासात आपणास अनेकदा त्याचे प्रत्यंतर दिसत) मी बोलत आहे अफगाणिस्तानविषयी. तिथे अत्यंत वेगाने वाढणाऱ्या तालीबानी प्रभावाविषयी.  या वर्षी 1मे पासून अमेरीकन.सैन्य अफगाणिस्तानमधून टप्याटप्याने माघारी जात असताना तालीबानच्या ताब्यातील प्रदेश वाढत आहे. जूलै च्या पहिल्या आठवड्यापर्यत एक तृतीयांश अफगाणिस्तान ताली