पोस्ट्स

मार्च ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवाश्यांचा सेवेसाठी की त्रासासाठी महाराष्ट्राची एसटी ?

इमेज
           आपल्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचे बोधवाक्य आहे "प्रवाश्यांचा सेवेसाठी, रस्ता इथे एसटी " . मी एसटी मार्फत आवडेल तिथे प्रवास, तसेच पूर्वी चालू असणाऱ्या 200 रुपये भरा आणि वर्षभर एसटीच्या प्रवाश्यात 10% सूट मिळावा अश्या अनेक अनेक सवलतींचा फायदा घेत खूप फिरलो आहे . मात्र आज मला आलेला अनुभव या आधी कधीच आलेला नाही . अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात . तसाच हा अनुभव असल्याने मी या विषयी संबंधितांचा विरुद्ध तक्रार करणार नाही .           तर मित्रानो नाशिकहून  200 किमी अंतरावर  असलेल्या ठिकाणी जाणाऱ्या बसेसमध्ये मी  नाशिकपासून 40  किमी अंतरावर असणाऱ्या ठिकाणी  जाण्यासाठी  चढलो . मी बसमध्ये  ती  नाशिकच्या ठक्कर बसस्थानकामध्ये फलाटावर असताना चढलो . मी चढलो तेव्हा बसमध्ये वाहक अथवा चालक नव्हते . वाहक गाडी बस्थानकातून बाहेर पडत असताना बसमध्ये आले बस  जवळपास नाशिकच्या बाहेर आली तरी वाहक तिकीट काढण्यासाठी न आल्याने मी स्वतः त्याच्या जवळ गेलो असता त्यांनी याठिकाणी बस थांबणार नसल्याचे सांगून नाशिकच्या बाहेर उतरण्यास सांगितले . मी त्याना गावात गाडी घेतली नाही तरी चालेल फाट्याव