पोस्ट्स

मार्च २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तणाव सहन करण्याची कला (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ 3)

इमेज
         तणावाबद्दल आपण मागील लेखात काही गोष्टी बघितल्या . या लेखात त्याबाबद्दल अधिक खोलात विस्ताराने चर्चा करूया. खेळातील टॅन तणाव कश्या प्रकारे हाताळायचा या बाबाबत आपण दिग्गज खेळाडूंची मते विचारात घेतल्यास आपणास सहजतेने खेळता येईल तणाव राहणार नाही . खेळातील तणावावर विश्वनाथन आंनद यांनी दिलेला सल्ला फारच मोलाचा आहे कार्लसन विरुद्धच्या डावात पत्रकारांनी आनंद यांना विचारले ,पुढील डाव जिंकल्यास आपला आत्मविश्वास वाढून आपण स्पर्धा जिंकाल का ? या प्रशांवर आनंद शांत राहिला काहीच बोलला नाही . दुसऱ्या पत्रकाराने आनंदला विचारले आपल्या जवळ काही योजना आहे का ? ज्यामुळे आपण आणि कार्लसन यांच्यातील गुणाचा फरक भरून निघेल याही वेल्स आनंद शांत राहिला तिसऱ्या पत्रकाराने विचारले आजची स्पर्धा मागच्या स्पर्धेच्या तुलनेत वेगळी आहे का ? या तिन्ही प्रश्नासाठी आंनद याने फारच समर्पक उत्तर दिले "मी एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष देतो'  . थोडक्यात आपण देखील एकाचवेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास  इतर विचार मनात  न आणल्यास आपले मन विचलित होणार नाही आणि आपण चांगला रिझल्ट देऊ शकाल .  सीम्सलाव हा सातवा जग

या धोक्याकडे कधी बघणार आपण?

इमेज
       मंगळवारी 29 मार्चला शैक्षणिक ताणतणावातून नाशिकच्या म्हसरुळ या उपनगरात एका तरुणीने आत्महत्या करुन जीवन संपवले. गेल्या काही दिवसातील वर्तमानपत्रे बघीतली, तर अस्या घटना सातत्याने घडतांना दिसतात. त्यातीलच एक अजून वाढीव घटना म्हणून याकडे बघता येणे अशक्य आहे. ज्या तरुणाइच्या जोरावर आपण महासत्तेचे स्वप्न बघत आहोत, ते सध्या कोणत्या मानसिक स्थितीत आहे, याची  लिटमस्ट टेस्ट म्हणूनच या घटनांकडे बघायला हवे. आपल्याकडे मानसिक आरोग्याबाबत असलेली अपुरी जाणीव या आत्महत्या होण्यास मुख्यतः कारणीभूत ठरतात. मानसिक आजार म्हणजे स्किझोफेनियाच, असी लोकांचा समाज असतो.मानसिक आजार हे विविध असतात , त्यापैकी एक म्हणजे स्किझोफेनिया, याची त्यांना माहितीच नसते.तसेच जर एखादा मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत आहे, हे समजले की, त्याचा बाबत विविध गैरसमज पसरवणे, आदी गोष्टींमुळे लोक अनेकदा गरज असताना सुद्धा मानसोपचार तज्ज्ञांकडे जात नाहीत. अर्थात पुर्वी होते, तितके सध्याचे चित्र वाइट नाही. आता अनेकजण मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी जात आहेत.जे स्वागतार्ह आहे,मात्र अजूनही हे प्रमाण कमीच आहे. ज्यात अजून वाढ होणे अत्यंत ग