पोस्ट्स

फेब्रुवारी १५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दादासाहेब फाळके ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                16 फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2023या वर्षी  गोष्टीला 77वर्षे पुर्ण होउन 78वे वर्ष  सुरु झाले आहे . या 78वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .आजमितीस त्यांच्या कोणीही वंशज चित्रपटश्रुष्टीत कार्यरत  नाही म्हणून त्यांचे योगदानाची फारशी दखल घेण्यात येत नाही फक्त दादासाहेब फाळके  पुरस्काराच्या वेळीच त्यांचा काय तो उल्लेख होतो इतकेच भारतरत्नाचे खरे वारसदार असून देखील