पोस्ट्स

जुलै २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेल्वेची घौडदौड सुरुच

इमेज
    सध्या भारतीय रेल्वे विक्रमी गतीने बदलत आहे. गेल्या आठवड्याभरात रेल्वेने तीन गोष्टी केल्या. त्यातील एक गोष्ट विश्वविक्रम करणारी होती,  आणि दुसरी गोष्ट रेल्वेच्या कचऱ्याची स्वस्तात विल्हेवाट लावून वर दानाचे पुण्य देखील पदरात पाडून घेणारी होती , तर तिसरी गोष्ट रेल्वेचे हवेतील प्रदुषण कमी व्हावे ,यासाठी करावयाचा उपक्रमातील महत्तवाचा टप्पा होती .आता या तिन्ही गोष्टी टप्याटप्याने बघूया . सुरवात विश्वविक्रमाने                                            तर मित्रांनो, या करोना काळात देखील रेल्वेमार्फत विविध प्रकारची कामे अव्याहतपणे सुरु आहेत. त्या अंतर्गतच वेस्टन डेडिकेटेड फ्रेड काँरीडर या मार्गाचे काम सुरु असताना हरीयाणा राज्यात मेवाड आणि गुरुग्राम  या दोन जिल्ह्यांना जोडणारा रेल्वेमार्गावर अरवली पर्वतरांगेत एक किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला . जर हा बोगदा तयार करण्यात आला नसता, तर सुमारे 40ते55 किमीचा फेरा पडला असता . तूम्हाला कदाचित वाटू शकते एक किलोमीटरचा बोगदा तयार केला , यात काय विशेष ?कोकण रेल्वेत असे अनेक बोगदे सापडतील, तर मित्रांनो हा बोगदा विशेष लांब नसेलही, मात्र या बोगद्