पोस्ट्स

नोव्हेंबर ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास

इमेज
            आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी काही महिन्यापूर्वीच   शपथ घेतली . त्या आदिवासी ( वनवासी ) समाजाच्या आहेत . या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत . आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून , तसेच शीख धर्मियातून , दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे . स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे , याचे हे उत्तम उदाहरण आहे . लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू . लोकशाहीचे काहीही संस्कार नसलेल्या देशाला त्यांनी जगातील पहिल्या क्रमांकाचा लोकशाही प्रधान देश म्हणून तयार केले         भारताची लोकशाही जगातील एक आश्चर्यकारी लोकशाही आहे या लोकशाहीत   जगात पहिल्यांदा वयाची ठरविक वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या व्यक्