पोस्ट्स

जानेवारी २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आणि नाशिककरांची मान ताठ होते.

इमेज
                 दिनांक 28जानेवारी 2022ही तारीख नाशिककरांसाठी सुर्वणाक्षरात लिहीली जाईल, असी होती. नाशिकचे सुपुत्र जगातील 19वे आणि भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांनी बुद्धीबळातील विद्यमान विश्वविजेते कार्लस मँग्नस यांच्या बरोबर टाटा स्टील चेस चँम्पियनमध्ये कठीण स्थितीतील डाव बरोबरीत सोडून आपण भविष्यातील मोठे दावेदार असल्याचे स्पष्ट केले आहे.                या डावात विदीत गुजराथी यांनी काळ्या मोहऱ्या घेवून खेळताना कठीण स्थितीत त्यांनी डाव बरोबरीत सोडवला आहे, हे विशेष . बुद्धिबळात चढाई करण्याचा विचार करता पांढऱ्या मोहऱ्या घेवून खेळणाऱ्या खेळाडूला, तो पहिला खेळत असल्याने अधिक संधी असते.काळ्याला पांढऱ्याचे आक्रमण परतवून लावत, पांढऱ्यावर आक्रमण करावे  लागते. हे आव्हान विदीत गुजराथी यांनी यशस्वी पेलल्याचे त्यांचा या डावातून दिसते.दोन्ही खेळाडूंनी राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली. त्यानंतर काही प्यादाच्या चाली खेळल्यानंतर दोन्ही खेळाडुंनी स्वतःच्या रंगातील उंट स्वतः च्या चौथ्या घरात (पांढऱ्यासाठी चौथी  तर काळ्यासाठी पाचव्या रांगेत) आणून   दोन्ही खेळाडू