पोस्ट्स

सप्टेंबर २०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकरांसाठी गौरवास्पद क्षण

इमेज
         २३ सप्टेंबर पासून  ८ ऑक्टोबर पर्यतचा कालावधी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण नाशिकचे भूमिपुत्र  असणारे तरुणाईचे आयकॉन विदित गुजराथी हे चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई स्पर्धेत बुद्धिबळ या खेळात भारताच्या पुरुष संघाचे कप्तान असणार आहेत एका नाशिककारास भारताचे नेतृत्व करायची संधी मिळणे ते देखील एशियाड सारख्या महत्वाच्या स्पर्धेत ही समस्त नाशिककरांना अभिनंदनास्पद बाबच म्हणावी लागेल              ही  बुद्धिबळ स्पर्धा जलद (रॅपिड ) प्रकारात खेळवली जाणार आहे फिडे वर्ल्ड कपमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे सर्व भारताला माहिती झालेल्या आर प्रग्ण्यांनंद, यांच्यासह डी गुकेश ,पेंटला हरिकृष्ण, अर्जुन एरिगैसी हे सर्व विदित गुजराथी नेतृत्वात खेळतील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील अंत्यंत उत्कृष्ट कामगिरीमुळे या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारतीय पुरुष संघाकडे लागलेल्या असतील महिला संघाचे प्रतिनिधित्व एशियाड या स्पर्धेत वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवलेल्या आणि महिला संघालासुवर्णपदक मिळून देण्यात मोलाची भूमिका पार पडणाऱ्या कोनेरू हंपी या करणार आहेत त्या हरिका द्रोणावल्ली,सविता श्र

उत्तर आफ्रिकेच्या घटनेतून आपण काय शिकणार ?

इमेज
          गेल्या पंधरा दिवसाचा आढावा घेतल्यास उत्तर आफ्रिकेच्या दोन देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात बळी घेतले . लिबिया या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आणि दोन धरणे फुटल्याने शब्दशः  हाहाकार उडाला. देशातील दोन मोठी शहरे अक्षरशः भुईसपाट झाली येथे खरेच शहरे होती का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा अशी तेथील भौगोलिक स्थिती झाली . तर मोरोक्को या देशात शक्तिशाली म्हणता येईल असा ६ पूर्णांक ८ शतांश तीव्रतेचा मोठा भूकंप झाला  ज्यामध्ये हजारो  जणांना आपले प्राण गमवावे लागले        उत्तर आफ्रिकेत झाले ना हे ! आपण भारतात राहतो आपण काय त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे ? आपल्याला काय कमी प्रॉब्लेम आहेत ?  म्हणून  याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण त्यांच्या चुकांमधून शहाणे होणे गरजेचे आहे आपल्या भारताचा विचार करता हिमालयीन प्रदेश भूकंपाच्या अति संवेदनशील भागात मोडतो.  भूगर्भ शास्त्रज्ञांनी हिमालयीन क्षेत्रात मोठा विनाशकारी भूकंप येण्याची शक्यता या आधीच वारंवार सांगितली आहेच          सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस देखील याच भागा