पोस्ट्स

डिसेंबर ८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

50 वर्ष अभिमानाची

इमेज
                                   या डिसेंबर महिन्यात एका मोठ्या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्प सुरु  होणार आहे. या घटनेने एक विश्वविक्रम केला आहे. ही घटना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही घटना आहे, भारताने  जगातील एका देशातील 90 हजार सैनिकांना युद्धकैदी बनवण्याची , जो एक जागतिक विक्रम आहे, ज्या देशातील सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले तो देश आहे, पाकिस्तान आणि  ती घटना आहे, पाकिस्तानचा पुर्व भाग पाकिस्तानचा तावडीतून सोडून स्वतंत्र देश  अर्थात बांगलादेशच्या निर्मितीची . येत्या 16 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या 49वा स्वातंत्र्यदिन आहे.हा अतूलनीय भीम पराक्रम करणाऱ्या भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा .                                               बांगलादेश, 1947 साली पाकिस्तानची निर्मिती होत असताना बंगाल प्रांताच्या पुर्वेकडील जो भाग पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला , तो भाग म्हणजे बांगलादेश.सन 1858ते 1947 आपल्यावर राज्य करणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशाच्या अर्धा भुभागा एव्हढा असणारा देश, भारताच्या पाच राज्यांना(पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपूरा , मिझोराम )सीमा असणारा द