पोस्ट्स

व्यक्तिरेखांवर आधारित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खगोलातील अढळ तारा निखळला

इमेज
खगोलशास्त्रप्रेमींची मंगळवार 20 मेची सकाळ उजाडली,ती एका दुर्देवी बातमीने.  डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाच्या बातमीने        खगोलशास्त्रप्रेमींना त्यातही मराठी जनांना आपल्यातीलच कोणीतरी भावना दाटून आली.    जगविख्यात शास्त्रज्ञ असून देखील आलेल्या पत्रांना आवर्जून उत्तर देणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. नारळीकर विख्यात होते.डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. पालकांच्या या ज्ञानाचा प्रभाव बालपणी डॉ जयंत नारळीकरांवर पडला.नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार ...

मला याचा अभिमान आहे?

इमेज
                             आपल्यापैकी अनेकांना एखादी व्यक्ती काही विशेष कारण नसेल तरीही आवडते‌. त्या व्यक्तीबाबत आपणास ममत्व वाटते.माझ्याबाबत देखील हा प्रकार घडतो.मला दोन व्यक्तीबाबत ममत्व वाटते .त्यातील एक इतिहासातील आहे‌.तर दुसरी व्यक्ती वर्तमानातील आहे‌. इतिहासातील व्यक्तीचे नाव आहे, नारायणराव पेशवा.ज्यांचा स्वत:चा आणि त्यांचा मुलाचा घराण्यातील सत्ता संघर्षात जीव गेला. (नारायणरावांचा खून प्रसिद्ध आहेच.तर त्यांचा मुलाला सवाई माधवराव यांना याच पेशव्यांचा सत्ता संघर्षातून आत्महत्या करावी लागली).वर्तमानकाळात असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे,सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद. आता या दोन एकमेकांशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तींबाबत एकाचवेळी ममत्व वाटायचे कारण काय ?असा आपणास प्रश्न पडला असेल ना? तर सांगतो मी, नारायणराव पेशवा आणि सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांच्यातील सामाईक दुवा म्हणजे आमच्या तिघांची जन्मतारीख एकच १०ऑगस्ट आहे. (अर्थात वर्ष वेगवेगळे) माझ्या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्ती म्हणून मला त्यांच्यावि...

महान समाजसुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर

इमेज
६ जानेवारी १९२४ ही फक्त एक दिनांक नाहीये क्रांतिकारकाबरोबर समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून सुटका होऊन रत्नागिरीत स्थानबद्धतेत रवानगी होण्याच्या हा दिवस आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वातील एक दुर्लक्षित पैलू असणाऱ्या समाजसुधारक हा पैलू क्रांतिकारक या पैलूसारखाच समाजात तेजानेफडकण्याच्या हा दिवस यावर्षी या घटनेला १०० वर्ष पूर्ण होत आहे       आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे   परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समजणे ब्रिटिशांच्या राजवटीचा फायदा घेत...

पंडित नेहरू थोरच

इमेज
     नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजकार्य असणाऱ्या एक ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी एक विधान केले ज्या विधानामुळे महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणत वादंग उठला . त्या विधानामुळे भारताच्या आतापर्यतच्या वाटचालीत पंडित नेहरूंचे योगदान नक्की किती ?या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली त्याविषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लेखन पंडित नेहरू थोरच      तर मित्रानो , पंडित नेहरूंच्या कार्यकाळात पंडित नेहरूंच्या काही चुका झाल्या हे मान्य केले तरी त्यांचे योगदान पूर्णतः नाकरण्यासारखे नाही . दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात ९० देश वसाहतवादातून स्वतंत्र झाले या देशांनी लोकशाहीची वेगवेगळी स्वरूपे स्वीकारली . काही देशांनी अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली तर भारतासारख्या काही देशांनी इंग्लडच्या धर्तीवर लोकशाहीची पद्धत जिला वेस्ट मिनिस्टर पद्धत म्हणतात ती स्वीकारली आज त्यानंतर सुमारे ७० ते ७५ वर्षांनी त्या त्या देशातील लोकशाहीची स्थिती आणि भारतातील लोकशाहीची स्थिती याचा आढावा घेतल्यास आपणस आपणस अनेक देशातील लोकशाही जवळप...

गायकी क्षेत्रातील टँजिडी क्वीन गिता दत्त

इमेज
        जूलै महिन्याची 20 तारीख उजाडली की सिने चाहत्यांना  आठवण होते ती , गिता दत्त यांची .अविट गाण्याची प्रतिभा लाभलेली असून देखील , प्रतिभावन तसेच अत्यंत हळव्या मनाचा आपल्या पतीचा आग्रहास्तव त्याने निर्माण केलेले , दिग्दशीत केलेले अथवा त्याने अभिनेता म्हणून काम केलेले चित्रपट वगळता अन्यत्र फारसी  न गायलेली गायिका गिता दत्त .पतीच्या विवाह्यबाह्य  प्रेमप्रकरणाला कडाडुन विरोध करणारी गायिका म्हणजे गिता दत्त .एका प्रसिद्ध सिने अभ्यासकाचा मते  गीता दत्ता या गायीका क्षेत्रातील मिनाकुमारी आहे ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मिनाकुमारी अभियानाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला.             गीता दत्त यांच जन्म सध्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले .त्यांच्या  सिनेकारकर्दीची सूरवात 1946 च्या आसपास होते. फारसे गायकीचे शिक्षण न घेता अंगभू...

मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

इमेज
       आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम   निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?   याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .   महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे   अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 19...

वंदन महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला

इमेज
            छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच   सर्व महाराष्ट्रयीन व्यक्तींची    छाती    गर्वाने फुलूनयेते   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य सर्वाना मनःपूर्वक खूप खूप   शुभेच्छा            तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली . त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात . मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी   महाराजांनी . अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे .   भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती . छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे ,...