पोस्ट्स

ऑक्टोबर २, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.

इमेज
सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास, सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते.मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या,त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्  कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे.जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे .या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते.यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते.३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतचा संपूर्ण १३७७ किलोमीटरचा टप्पा इलेक्ट्रीक इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात येवून पुर्ण क्षमतेने इलेक्ट्रीक इंजिनाचा वापर करत मालवाहतूकीसाठी तयार असल्याचे जाहीर करण्या