पोस्ट्स

जानेवारी १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत चीन संबंध कोणत्या दिशेकडे ? (बातमीतील चीन भाग १७)

इमेज
                  भारताचे आणि चीनचे संबंध नक्की कोणत्या दिशेकडे जात आहेत ? असा प्रश्न पडावा अश्या अनेक परस्परविरोधी घडामोडी सध्या या दोन देशांच्या बाबतीत घडत आहेत. एकीकडे सीमेबाबत परस्पर संमती  करण्याच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेच्या फेऱ्या एकामागून एक अपयशी ठरत असताना, २०२० पेक्षा २०२१ मध्ये सुमारे ४३. ३% अधिक  रकमेच्या परस्पर व्यापार झाल्याचे G eneral Administration of Customs तर्फे प्रकाशित अहवालातून स्पष्ट होत आहे. शनिवार १४ जानेवारी हा अहवाल प्रकशित करण्यात आला आहे. या अहवालामध्ये भारत चीन मधील व्यापारात  भारत चीनकडून अधिक प्रमाणात आयात करतो, मात्र भारताची चीनला निर्यात कमी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारताने चीनकडून ९७अब्ज ५२ कोटी अमेरिकी डॉलरची आयात केली तर भारताची चीनला निर्यात २८ अब्ज १४ कोटी अमेरिकी डॉलरची निर्यात केली २०२०मधील व्यापाराच्या विचार करता भारताची निर्यात  ३४. २% वाढली तर आयात ४६. २ % वाढली. राजनैतिक स्तरावरचा विचार करता लडाख मधील घुसखोरीमुळे भारत चीन मधील संबंध गेल्या काही वर्षातील सर्वात न्यूनतम पातळीवर आहेत. चीनच्या उत्पादनावर