पोस्ट्स

नोव्हेंबर २८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कालापाणी : भारत नेपाळ संबंधातील मिठाचा नवा खडा

इमेज
                                          सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना आपल्या भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ बरोबर आपला सीमावाद सुरु झाला आहे . आणि या वादाला कारणीभूत ठरला आहे एक नकाशा . 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळे केल्यावर त्यांची सीमा ठरवणारा नकाशा भारताने 2 नोव्हेंबर 2019 ला प्रसिद्ध केला, आणि हाच नकाशा भारताच्या आणि नेपाळच्या बाबतीत वादाचा विषय ठरला आहे . नेपाळच्या  हद्दीतील कालापाणी भारताने स्वतःच्या क्षेत्रात दाखवले आहे, अशा आरोप नेपाळने 6 नोव्हेंबर 2019मध्ये पत्रकार परिषद घेऊन केला आहे .   त्याला  भारताने कडाडून विरोध केला आहे . भारताच्या सीमाविषयक नकाश्यात काहीच बदल करण्यात आलेला नाही . फक्त काश्मीर चा नकाशा बदलल्याने त्याचाच नकाशा बदलला आहे  . जेव्हा भारतात कोणतेही नवीन राज्य , जिल्हा निर्माण होतॊ त्यावेळी भारताच्या सरकारतर्फे दरवेळी नकाशा प्रकाशित करण्यात येतो , त्याचचा भाग म्हणून सदर नकाशा प्रकाशित करण्यात आल्याचा दावा  भारताने केला आहे    .