पोस्ट्स

ऑक्टोबर २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!)

इमेज
य स ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!)  हो आम्ही देखील हे करून दाखवू शकतो हे भारताच्या दिव्यांगांच्या एशियाडमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी शनिवार २८ ऑक्टोबररोजी जगाला दाखवून दिले या वेळच्या एशियाडमध्ये सर्व साधारण गटात भारताने यावेळी १०० पदके मिळवून दाखवीलच असा निर्धार केला होता जो त्यांनी प्रत्यक्षात आणून देखील दाखवला त्यावेळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला क्रिकेटखेरीज अन्य खेळात घवघवीत यश मिळाल्याच्या धक्का यावेळी भारतीयांना या खेळाडूंनी दिला यातूनच यस ! वी अल्सो डू धिस !! ( YES WE ALSO DO THIS !!) असा चंग  भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी दाखवत तो खरा करत सर्वसाधारण खेळाडूंच्या पदकतालिकेपेक्षा १ सुवर्ण आणि १० कास्य पदके मिळवत एकूण पदकतालिकेत सर्वसाधारण खेळाडूंपेक्षा ४ पदके जास्त मिळवत भारतीयांना एक मोठा सुखद धक्का दिला आहे त्याबाबदद्ल या खेळाडूंचे करावे तितके कौतुक कमीच आहे          शारीरिक अक्षमता हि मनुष्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही तर मनाचा निग्रहच त्यापासून रोखतो हे या यशातून स्पष्ट झाले आहे तसे बघायला गेलो तर सर्वसाधारण खेळ आणि हे दिव्या