पोस्ट्स

एप्रिल ४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय अस्थिरतेचा एक अध्याय पूर्ण

इमेज
       ४ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाकडून पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबत दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी करताना पाकिस्तानी निवडणूक आयोगाला १४ मे रोजी निवडणूक घेण्याचे आदेश दिले या आधी  पाकिस्तानी पंजाबच्या राज्यपालांचे लाहोर  उच्च न्ययालयाच्या आदेशानुसार  ३० एप्रिलला निवडणुका घेण्याचे नियोजन होते  त्यानुसार योग्य ती कार्यवाही देखील सुरु होती मात्र अचानक  पाकिस्तानी निवडणूक आयोगाने देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघता एप्रिलमध्ये निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवली पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या मतानुसार पाकिस्तानी पंजाबच्या निवडणुका या केंद्रीय निवडणुकेबरोबर घेता येणे शक्य असल्याचे सांगत, निवडणुकांची प्रक्रिया थांबवली होती पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या या कृतीविरुद्ध पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागितली होती या निवणुकीसाठी फारसा खर्च लागणार नाही तसेच  पाकिस्तानात सध्या आहे त्यापेक्षा वाईट सामाजिक स्थितीत या आधी निवडणूक झालेल्या आहेत तसेच पाकिस्तानी संविधानुसार विध