पोस्ट्स

जून १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असी आहे आपली एसटी .....!

इमेज
      मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची एसटी भारतातील एक प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या 10 प्रमुख प्रकारच्या बससेवा या आपल्या एसटीमार्फत पुरवल्या जातात. या 10 प्रमुख प्रकारातील एका प्रकारचे 5 उपप्रकार देखील पडतात.  आपली एसटी महामंडळ विविध प्रादेशिक विभाग आणि आगारमधून ही सेवा पुरवली जाते. चला तर जाणून घेवूया एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा. साधी बस  1) परीवर्तन सेवा: एसटी महामंडळाची ही सर्वात स्वस्त आणि खेडोपाडी चालणारी सेवा आहे. या सेवेला लालपरी म्हणून देखील ओळखले जाते.  या सेवेचे विठाई, हरीत कुंभ,  विद्यार्थी सेवा, एम एस बाँडी, साधी बस असे उपप्रकार पडतात. आता जाणून घेवूया याचे उपप्रकार  अ)हरीत कुंभ :नाशिकला कुंभमेळा असताना 2014-2015ला एसटी महामंडळामार्फत ही सेवा सुरु करण्यात आली. या बसेसचा रंग हिरवा असतो. पर्यावरणपुरक कुंभमेळ्याचा संदेश जनसामन्यापर्यत पोहोचवण्यासाठी या बसेसची निर्मिती करण्यात आली होती. ब)विद्यार्थी सेवा: खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे, सोयीचे व्हावे यासाठी  महामंडळातर्फे ही सेवा सुरु करण्यात आली. शाळा, महाविद्यालयाचा वेळेत यामधून प