पोस्ट्स

जुलै २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकरांची मान उंचावणारे बुद्धिबळपटू

इमेज
           आज हा मजकूर लिहीत असताना (26जुलै ) स्मार्ट सिटीच्या कामामुळे,  लांबलेल्या पावसामुळे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या अनुपलब्धतेमुळे सर्वसामान्य नाशिककर  पिचला गेलेला असताना दोन नाशिकर खेळाडू बुद्धिबळाच्या क्षेत्रात जगभरात नाशिकचे नाव उंचावत आहेत ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  महिला इंटरनॅशनल  मास्टर प्रचिती चंद्रात्रे हे दोन ते हिरे .त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात नाशिकचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन . एक नाशिकर म्हणून मला त्यांचा  सार्थ अभिमान वाटतो .        प्रचिती चंद्रात्रे  यांनी नुकतीच 17  वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी असणारी अशियन चेस चॅम्पियनशिप  रौप्य  पदक मिळवत जिंकलेली आहे .  सर्वप्रथम जिल्हा पातळीवर स्पर्धा जिंकत  त्यानंतर राज्य पातळीवरील स्पर्धा आणि  देशपातळीवरील विजयाचा रथ तसाच ठेवत भारताचे  शालेय स्तरावरील बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले . आणि आशियाई स्पर्धेत ही विजयश्री खेचून आणली         ग्रँडमास्टर विदित गुजराथी सध्या रशियातील सौल जवळ सुरु असणाऱ्या वर्ल्ड चेस कपमध्ये  अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे . विदित हे  मजकूर लिहीत असताना अंतिम आठ जा