पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विलीनीकरण

इमेज
    एसटी बसमध्ये 75 वर्षावरील प्रवाश्यांना मोफत प्रवास्याची घोषणा  झाल्यानंतर, एसटीबाबतच्या विविध बाबीविषयी पुन्हा एकदा चर्चेला सुरवात झाली. ज्यामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात राजकारणाचा मुद्दा झालेला एसटीचे  सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण करण्याचा मुद्दा देखील होता       विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी एसटीच्या ऐताहासिक संपाच्या वेळी ,आम्ही सत्तेत आल्यानंतर तात्काळ विनाविलंब एसटीचे सरकार मध्ये पुर्णतः विलीनीकरण करु , असे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्नाबाबत पुर्णतः असंवेदनशील असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. आता सरकार स्थापून  दिड महिना झाला आहे. पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरु झाले आहे, या अधिवेशनात एसटीच्या विलिनीकरणाबाबत सरकार काय भुमिका घेते?याकडे एसटी कर्मचारी डोळे लावून बघत आहे.          त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण कोणत्याच स्थितीत शक्य नसल्याचे वारंवार सांगून देखील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार तयार नसल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत ह